शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांचाही निर्णय उपमहापौरांनी झिडकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 19:35 IST

स्त्री रुग्णालय प्रकरण : जागा देण्यास विरोध कायम

ठळक मुद्देगिते-फरांदे यांच्यातील वाद आणखी पेटण्याची शक्यता शंभर खाटांच्या स्त्री रुग्णालयासाठी महासभेने भाभानगर येथील जागा देण्याचा ठराव

नाशिक : स्त्री रुग्णालयाचा वाद पूर्णपणे मिटला असून, आजी-माजी आमदारांची त्याबाबत आता कुठलीही तक्रार नसल्याचे स्पष्टीकरण पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिल्यानंतरही माजी आमदार व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते आणि प्रभागाचे नगरसेवक व विद्यमान उपमहापौर प्रथमेश गिते यांनी स्त्री रुग्णालयाला जागा देण्यास आपला विरोध कायम असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणात मुख्यमंत्र्यांपाठोपाठ पालकमंत्र्यांचीही शिष्टाई असफल ठरली असून, गिते-फरांदे यांच्यातील वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.शासन अनुदानातून साकारणाऱ्या  शंभर खाटांच्या स्त्री रुग्णालयासाठी महासभेने भाभानगर येथील जागा देण्याचा ठराव केल्यानंतर स्थानिक नागरिकांसह प्रभागाचे नगरसेवक व विद्यमान उपमहापौर प्रथमेश गिते यांनी जागा देण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. स्त्री रुग्णालयाच्या जागेवरून विद्यमान भाजपा आमदार प्रा. देवयानी फरांदे व माजी आमदार वसंत गिते यांच्यात संघर्ष पेटला आहे. सोमवारी (दि.३०) जनता दरबाराच्या पार्श्वभूमीवर उपमहापौर प्रथमेश गिते यांनी नागरिकांसह पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन रुग्णालयास जागा देण्यास विरोध दर्शविला होता. यावेळी पालकमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन नागरिकांना दिले होते. मात्र, पत्रकारांशी बोलताना महाजन यांनी सदर प्रकरणी वाद मिटल्याचे सांगत महापालिकेने निश्चित केलेल्या जागीच रुग्णालय होणार असल्याचे ठामपणे स्पष्ट केले. त्यामुळे गिते यांना पाऊल मागे घ्यावे लागल्याची चर्चा असतानाच वसंत गिते व प्रथमेश गिते यांच्यासह नागरिकांनी रुग्णालयास जागा देण्यास आपला विरोध कायम असल्याचे स्पष्ट केले आहे. कोणत्याही परिस्थितीत सदर जागेत रुग्णालय होऊ दिले जाणार नाही, अशी ठाम भूमिकाही गिते यांनी घेतल्याने सदर प्रकरण मिटण्याऐवजी आणखी पेटण्याची चिन्हे दिसून येत आहेत.रुग्णालय होणार नाहीस्त्री रुग्णालयाच्या जागेचा वाद अद्याप मिटलेला नाही आणि भाभानगर येथे प्रस्तावित रुग्णालय आम्ही होऊ देणार नाही. ज्या जागेवर रुग्णालयाचे आरक्षण आहे तेथे खुशाल रुग्णालय बांधावे. पार्किंगच्या जागेत रुग्णालय होण्यास आमचा ठाम विरोध आहे. त्यासाठी आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे.- वसंत गिते, प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा

टॅग्स :Womenमहिलाhospitalहॉस्पिटल