शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

वावी ते गड पदयात्रेचे प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2016 22:51 IST

वावी ते गड पदयात्रेचे प्रस्थान

 वावी : चैत्र पौर्णिमेला श्री सप्तशृंगगडावर भरणाऱ्या यात्रोत्सवासाठी सिन्नर तालुक्यातील वावी येथून सुमारे १५० भाविक पायी दिंडीद्वारे रवाना झाले आहेत. गेल्या चार वर्षांपासून वावी ते सप्तशृंगगड पायी दिंंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षी दिंडी सोहळ्याचे हे पाचवे वर्ष आहे. यात्रोत्सवासाठी सोमवारी दुपारी भाविक पायी दिंडीने रवाना झाले. मिठसागरे, पंचाळे, वडांगळी, हिवरगाव, म्हाळसाकोरे, मांजरगाव, करंजगाव, कोठुरे, पालखेड, वडनेरभैरव, बहादुरी, माहुडी, वणी यामार्गे जाणाऱ्या या दिंडीतील यात्रेकरूंसाठी ठिकठिकाणी चहा, थंड पेय, अल्पोपाहार व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. पदयात्रेसाठी आकर्षक रथ सजविण्यात आला असून, दिंडीसोबत टेम्पो, पाण्याचा टॅँकर असणार आहे. रविवारी सायंकाळी प.पू. रामप्रभूजी महाराज यांच्या हस्ते रथाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर रथाची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. सोमवारी दुपारी दिंडीचे श्री सप्तशृंगगडाकडे प्रस्थान झाले. पदयात्रेचे नियोजन श्री सप्तशृंगीमाता पदयात्रा सेवा मंडळ व जय बजरंग मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे. (वार्ताहर)वावी येथून श्रीक्षेत्र सप्तशृंगगडाकडे निघालेल्या पदयात्रेसाठी सजविण्यात आलेला आकर्षक रथ.