शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेतील अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 01:13 IST

नाशिक : महापालिकेच्या विविध उच्चपदस्थ अधिकाºयांच्या चौकशीचा प्रस्ताव महासभेने स्थगित केला असतानादेखील प्रशासनाने त्याची कार्यवाही सुरू केली असून, गेल्या सोमवारपासून विभागीय चौकशी अधिकारी हांडगे यांनी कामकाजास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देउच्चपदस्थांचा समावेश : स्थगिती असतानाही कारवाई

नाशिक : महापालिकेच्या विविध उच्चपदस्थ अधिकाºयांच्या चौकशीचा प्रस्ताव महासभेने स्थगित केला असतानादेखील प्रशासनाने त्याची कार्यवाही सुरू केली असून, गेल्या सोमवारपासून विभागीय चौकशी अधिकारी हांडगे यांनी कामकाजास सुरुवात केली आहे.महापालिकेच्या वतीने चालू वर्षीच गंगापूररोडवरील ग्रीन फिल्ड लॉन्सच्या संरक्षक भिंतीचे बेकायदेशीर बांधकाम पाडले जात असताना जागा मालक प्रकाश व विक्रांत मते यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून स्थगिती मिळविली होती. सदरचे आदेश प्राप्त होऊनही महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केल्याने बांधकाम पाडण्यात आले आणि त्यामुळे उच्च न्यायालयाचा अवमान झाल्याने महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना माफी मागावी लागली तसेच १७ लाख रुपये खर्च करून सदरची संरक्षक भिंत बांधावी लागली. या प्रकरणात प्रशासनाने केलेल्या चौकशीत अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, अतिक्रमण उपआयुक्त रोहिदास बहिरम आणि अभियंता पी. बी. चव्हाण यांची चौकशी आरंभण्याचा प्रस्ताव महासभेवर सादर केला होता. त्याचप्रमाणे सेवानिवृत्त प्रभारी शहर अभियंता उत्तम पवार, माजी मुख्य अग्निशमन दल अधिकारी अनिल महाजन आणि माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुभाष भंडारी यांची चौकशी करण्याचा प्रस्तावदेखील १९ आॅक्टोबर रोजीच्या महासभेवर मांडला होता; परंतु महासभेने यासंदर्भात शंका घेऊन हा विषय तहकूब ठेवला होता.सोमवारपासूनच कामकाजसदरचा प्रस्ताव तहकूब असताना प्रशासनाने चौकशी मात्र सुरू केली असून, चौकशी अधिकाºयांनी सोमवारपासूनच कामकाज सुरू केल्याचे प्रशासकीय अधिकाºयांनी सांगितले.