शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

रिक्त पदांवर भरतीसाठी विभागीय शिक्षण मंडळ कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 02:29 IST

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कर्मचारी महासंघटनेतर्फे मंगळवारी (दि.४) जेवणाच्या सुट्टीत कर्मचाºयांनी मंडळ प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करून आंदोलन केले.

ठळक मुद्देकाळ्या फिती : मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कर्मचारी महासंघटनेतर्फे मंगळवारी (दि.४) जेवणाच्या सुट्टीत कर्मचाºयांनी मंडळ प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करून आंदोलन केले.आस्थापनेतील रिक्त पदे भरण्याच्या मागणीसाठी दि. १५ नोव्हेंबरपासून संघटनेने आंदोलनात्मक पवित्रा घेतला असून, मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार महासंघटनेने केला आहे. रिक्त पदांवर भरतीसाठी विभागीय शिक्षण मंडळ कर्मचाºयांचे आंदोलन शिक्षण मंडळाच्या राज्यभरातील नऊ विभागीय मंडळ कार्यालयांसह व राज्यस्तरीय कार्यालयांमध्ये वर्ग-३ व वर्ग-४ ची सुमारे २५० कर्मचाºयांची पदे रिक्त आहेत. या सर्व पदांवर तत्काळ भरतीप्रक्रिया राबविण्याच्या मागणीसाठी कर्मचारी महासंघटनेने दि. १५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत काळ्या फिती लावून काम करताना आंदोलनात्मक पवित्रा घेतला होता. आता हे आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी संघटनेने १ डिसेंबरपासून काळी फित लावून काम करतानाच जेवणाच्या सुटीत शासन व प्रशासनाविरोधात घोषणाबाजीच्या माध्यमातून आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. अशाप्रकारे १६ डिसेंबरपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचेही यावेळी संघटनेतर्फे स्पष्ट करण्यात आले. कर्मचारी महासंघटनेच्या माध्यमातून रिक्त पदांवर भरतीसाठी संपूर्ण राज्यभरात असेच आंदोलन होत असून, नाशिकमध्ये या आंदोलनात कर्मचारी महासंघटनेचे अध्यक्ष मोहनदास नायडू यांच्यासह सरचिटणीस शालिग्राम चव्हाण, दिनकर पाटील, योगेश नाईक, कैलास नागपूर, दिनेश मुसळे, गणेश कस्तुरेस, अक्षय शहा आदींसह संघटना कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्यांनी सहभाग घेत शासन व प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली.३१ डिसेंबरला सामूहिक रजाकर्मचाºयांच्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर १७ डिसेंबरपासून काळ्या फिती लावून काम करण्यासह जेवणाच्या सुटीत शासन व प्रशासनाविरोधात घोषणाबाजी, अधिक च्या कामासाठी अनुपस्थित राहणे, कार्यालयीन कामासाठी कार्यालयाबाहेर, बाहेरगावी न जाणे, शासकीय नियमानुसार कार्यालयीन वेळेतच उपस्थित राहत आंदोलनात्मक पवित्रा कायम ठेवण्याचा निर्धार कर्मचारी महासंघटनेने घेतला आहे. त्यानंतरही भरतीप्रक्रियेविषयी सकारात्मक निर्णय झाला नाही तर ३१ डिसेंबरला सामूहिक रजा आंदोलन करण्याचा इशारा देतानाच चौथ्या टप्प्यात दि. १ ते १५ जानेवारीपर्यंत पुन्हा काळी फित लावून काम करतानाच घोषणा देणे, प्रथम सत्रात एक तास उशिरा कामावर उपस्थित राहून आंदोलन सुरूच ठेण्याचा निर्धार कर्मचारी महासंघटनेने व्यक्त केला आहे.