शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नवागतांच्या स्वागतासाठी शिक्षण विभाग सज्ज

By admin | Updated: June 14, 2017 00:19 IST

पहिल्याच दिवशी मिळणार पाठ्यपुस्तके

पहिल्याच दिवशी मिळणार पाठ्यपुस्तकेलोकमत न्यूज नेटवर्कसायखेडा : १५ जून अर्थातच नवीन विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा आरंभ, तर शाळेतील विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस. हा दिवस आनंददायी आणि आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा व्हावा यासाठी निफाड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने जोरदार तयारी केली आहे.गुरुवारी शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे गावातून निघणाऱ्या प्रवेश दिंडी सोहळ्याने व गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात येणार आहे.मोफत शिक्षणाचा अधिकार या कायद्याअंतर्गत ६ ते १४ वयोगटातील मुलांना दर्जेदार प्राथमिक शिक्षण मिळाले पाहिजे, एकही विद्यार्थी शालेय शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी गृहभेटी आणि पालक जनजागृती करून पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत विविध उपक्रमांद्वारे झाले पाहिजे यासाठी निफाड तालुका पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने पूर्ण तयारी केली आहे शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व शाळांवर तालुका व जिल्हा पातळीवरील अधिकारी शाळाभेटी देणार आहेत. शालेय पोषण आहारात पहिल्या दिवशी मुलांना गोड पदार्थ देण्यात यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शाळेच्या पहिल्या दिवसाची तयारी करण्यासाठी शिक्षक तीन दिवसांपासून शाळेत जाऊन तयारी करत आहेत. शालेय आवार, वर्गखोली, कार्यालय यांची साफसफाई करून वर्गाच्या पुढे तोरणे, पताका लावून सजावट करण्यात आली आहे. एकंदरीतच शाळेच्या पहिल्या दिवसाची जोरदार तयारी शिक्षण विभागाने केली आहे.