शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पुरातत्व विभाग : नाशिक विभागातील २१ संस्थांमधील कार्यकर्त्यांचा शासनाकडून गौरव स्वच्छतादूतांच्या कर्तृत्वाला सत्काराचे ‘कोंदण’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 22:16 IST

मनमाड : राज्य संरक्षित व राष्टÑीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेल्या गड-किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी पुरातत्व विभागाकडून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन गडांची स्वच्छता व स्वच्छतेची जनजागृती करणाºया संस्थांच्या कार्याची शासनाकडून दखल घेण्यात आली आहे. नाशिक विभागातील पाच किल्ल्यांवर स्वच्छतेसाठी योगदान देणाºया २१ संस्था व संघटनांचा मुंबई येथे ‘गड संरक्षण स्वच्छता सन्मान’ सोहळ्यामध्ये गौरव करण्याचा निर्णय पुरातत्व विभागाकडून घेण्यात आला आहे.

ठळक मुद्दे नाशिक विभागातील २१ संस्थांमधील कार्यकर्त्यांचा शासनाकडून गौरवस्वच्छतादूतांच्या कर्तृत्वाला सत्काराचे ‘कोंदण’!

गिरीश जोशी ।मनमाड : राज्य संरक्षित व राष्टÑीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेल्या गड-किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी पुरातत्व विभागाकडून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन गडांची स्वच्छता व स्वच्छतेची जनजागृती करणाºया संस्थांच्या कार्याची शासनाकडून दखल घेण्यात आली आहे. नाशिक विभागातील पाच किल्ल्यांवर स्वच्छतेसाठी योगदान देणाºया २१ संस्था व संघटनांचा मुंबई येथे ‘गड संरक्षण स्वच्छता सन्मान’ सोहळ्यामध्ये गौरव करण्याचा निर्णय पुरातत्व विभागाकडून घेण्यात आला आहे.महाराष्टÑ अगदी प्राचीन काळापासून वीरांची भूमी म्हणून ओळखला जातो. राज्यातील गड-किल्ले हे जनतेच्या अस्मितेचे प्रतीक बनले आहेत. या किल्ल्यांची देखभाल, जतन व संवर्धन करणे, त्यांची स्वच्छता ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. या दृष्टिकोनातून महाराष्टÑ शासनातर्फे १६ सप्टेंबर २०१६ ते १६ आॅक्टोबर २०१६ या कालावधीमध्ये राज्य संरक्षित स्मारक व राष्टÑीय संरक्षित स्मारकांवर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यास चांगला प्रतिसाद मिळाल्याने स्थानिक पातळीवरील स्वयंसेवी संस्था तसेच शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या सहभागातून स्वच्छता मोहीम व स्वच्छतेसाठी जनजागृती करण्यात आली. या उपक्रमामुळे प्राचीन वास्तुशास्त्राचे नमुने, ऐतिहासिक स्थळे आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या विभागातील पाच किल्ले व गडांवर स्वच्छतेचा जागर घुमला. पुरातत्व विभाग नाशिक यांच्या अंतर्गत राज्य संरक्षित स्मारक व राष्टÑीय संरक्षित स्मारक असलेल्या मनमाडजवळील अनकाई-टणकाई किल्ला, मालेगाव किल्ला, गाळण (ता. मालेगाव) येथील किल्ला, खर्डा (जि. अहमदनगर) येथील किल्ला, पारोळा (जि. जळगाव) या पाच किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. किल्ला परिसरातील घाण कचरा, प्लॅस्टिक रिकामी पाकिटे, कॅरीबॅग गोळा करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली.पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. श्रीकांत घारपुरे, तंत्र सहायक अमोल गोटे, जतन सहायक रमेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अनकाई-टणकाई किल्ल्यांवरील स्वच्छता मोहिमेसाठी महाराष्टÑ इंजिनिअर्स असोसिएशन मनमाड शाखा, अहल्याबाई होळकर विद्यालय, मनमाड महाविद्यालय, मनमाड पालिका, अनकाई ग्रामपंचायत यांनी सहभाग घेतला होता. उपक्रम यशस्वी करण्याच्या कार्याची शासनाकडून दखल घेण्यात आली आहे. मुंबई येथे दि. २३ नोव्हेंबर रोजी सांस्कृतिक कार्य विभाग मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या गड संवर्धन सन्मान सोहळ्यात नाशिक विभागातील २१ संस्था व संघटनांचा गौरव करण्यात येणार आहे.

राज्य संरक्षित स्मारक व राष्टÑीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित असलेल्या विभागातील पाच गड-किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबवून जनजागृती करणाºया २१ दुर्गप्रेमी व सेवाभावी संस्थांचा मुंबई येथे गड संवर्धन सन्मान सोहळ्यात शासनाकडून गौरव करण्यात येणार आहे.- डॉ. श्रीकांत घारपुरे, सहायक संचालक, पुरातत्व विभाग.