पेठ : कोजागरी पौर्णिमेला सप्तशृंगीदेवीचा जागर करीत पेठ शहर व परिसरातून शेकडो कावडीधारक वणी-गडाकडे रवाना झाले आहेत. दरवर्षी पेठहून विविध सामाजिक मंडळे कावड यात्रेचे आयोजन करतात. प्रत्येक वर्षी भाविकांची संख्या वाढत असून, दोन दिवसांत हे भाविक पेठ ते सप्तशृंगगड हे अंतर अनवाणी प्रवास करून भगवतीच्या चरणी लीन होत असतात. रानदेवी मंदिरापासून या यात्रेला प्रारंभ झाला.
पेठ येथून कावडधारक गडाकडे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 00:33 IST