शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

देवळाली कॅम्पला महिलेचे मंगळसूत्र खेचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:14 IST

रंजना मंगल नणसे (रा.रेल्वे पुलाजवळ, संसरी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. नणसे या शुक्रवारी (दि.५) रात्रीचे भोजन आटोपून ...

रंजना मंगल नणसे (रा.रेल्वे पुलाजवळ, संसरी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. नणसे या शुक्रवारी (दि.५) रात्रीचे भोजन आटोपून शतपावलीकरिता घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली. संसरी लेन भागातील भवानी सोसायटी समोरून त्या पायी जात होत्या. यावेळी अंधाराचा फायदा घेत दुचाकीने भरधाव आलेल्या दोघांपैकी एका चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे ४५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र ओरबाडून नेले.

---

स्टीलची हातगाडी केली लंपास

नाशिक : हॉटेलच्या शटरला बांधून ठेवलेली स्टिलची चारचाकी हातगाडी चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना अमृतधाम भागात घडली. हातगाडीत खाद्यपदार्थ बनविण्याचे साहित्य होते. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल सुभाष दराडे (रा.विडी कामगारनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. दराडे यांचा हॉटेल व्यवसाय असून त्यांचे अमृतधाम परिसरात दराडे फुडस नावाचे हॉटेल आहे. पुरेशी जागा नसल्याने त्यांनी हॉटेलबाहेर स्टेनलेस स्टिलची गाडी बनविली होती. गेल्या २८ जानेवारी रोजी रात्री दुकान वाढवून ते घरी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री दुकानाबाहेर साखळीस बांधलेली चारचाकी स्टिलची गाडी चोरून नेली. या गाडीत खाद्यपदार्थ बनविण्याचे साहित्य व गॅस शेगडी असा सुमारे ३० हजारांचा ऐवज होता.

----

गॅसच्या भडक्यात महिला ठार

नाशिक : गॅसच्या भडक्यात भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना खुटवडनगर भागात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पुष्पा बळीराम पगार (५२ रा.खुटवडनगर) असे मयत महिलेचे नाव आहे. पुष्पा पगार शुक्रवारी (दि.५) आपल्या घरात स्वयंपाक करत असताना ही घटना घडली होती. गॅसचा भडका अचानक उडाल्याने त्या गंभीर भाजल्या होत्या. कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ गंगापूररोडवरील गंगा रेसिडेन्सी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता वैद्यकीय सूत्रांनी मयत घोषित केले.

---

मखमलाबादला एकाची आत्महत्या

नाशिक : मखमलाबाद परिसरात राहणाऱ्या ४० वर्षीय व्यक्तीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. सदर व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राहुल माणिकराव पाटील (४० रा.अवानिस हरमुनी अपा.म.बाद) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. राहुल पाटील यांनी बुधवारी (दि.३) रात्री अज्ञात कारणातून सिटी सेंटरसमोर विषारी औषध सेवन केले होते. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

----

सिडकोत एकाची आत्महत्या

नाशिक : सिडकोतील मोरवाडी भागात राहणाऱ्या ३० वर्षीय युवकाने गळफास लावून आत्महत्या केली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सुनील पावरा (३० रा.मोरवाडी गाव) असे मृत तरुणाचे नाव असून तो ज्ञानेश्वर इप्पर यांच्या घरात भाडेतत्त्वावर राहत होता. पावरा याने शुक्रवारी (दि.५) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात पत्र्याच्या अ‍ँगलला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली. इप्पर यांनी खबर दिल्याने अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.