शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

देवळा-विठेवाडी रस्त्याची दुरवस्था

By admin | Updated: August 8, 2014 00:57 IST

देवळा-विठेवाडी रस्त्याची दुरवस्था

 

देवळा : देवळा-विठेवाडी रस्त्याचे गतवर्षी केलेले काँक्रीटीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहनधारकांना कसरत करतच वाहन चालवावे लागत आहे. शिवाजीनगर, विद्यानगर, इंदिरानगर आदि परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.देवळा तालुक्यात जुलै महिन्यात खर्डा येथे मुख्यमंत्री दुष्काळ निधीतून झालेले सीमेंट प्लग साखळी बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे निदर्शनास आल्याने हे काम तोडून पुन्हा नवीन करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या नगरपालिका स्थानिकस्तरच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. तसेच या योजनेअंतर्गत तालुक्यात सुरू असलेल्या सर्व कामांची चौकशी करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले होते. सीमेंट प्लग बंधाऱ्याचे काम निकृष्ट होण्यास संबंधित ठेकेदार जेवढा जबाबदार आहे, तेवढीच जबाबदारी या कामावर देखरेख करणाऱ्या शाखा अभियंत्यांची व विभागाचीदेखील आहे. देवळा तालुक्यात अनेक ठिकाणी शासनाच्या विविध विभागांमार्फत रस्ते, बंधारे, पूल आदिंची दुरुस्तीची किंवा नवीन काम सुरू आहेत. परंतु या कामांवर संबंधित विभागाचा कर्मचारी देखरेख करताना क्वचित ठिकाणी दिसून येतो. कामावर देखरेख नसल्याने कामाचा दर्जा घसरण्याची शक्यता निर्माण होते.जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत देवळा - विठेवाडी रस्त्यावर २७५ मीटर लांबीचे रस्ते काँक्रीटीकरणाचे काम गतवर्षी पूर्ण करण्यात आले. काम उत्कृष्ट दर्जाचे व्हावे यासाठी दोन महिने हा रस्ता वाहतुकीला बंद करण्यात आला होता. काळजी घेऊनही रस्ता वाहतुकीसाठी खुला केल्यानंतर लवकरच रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले. काँक्रीटची खडी वर उखडून आली. यामुळे वाहन चालवताना अडचण निर्माण होऊ लागली. (वार्ताहर)