शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी बाधित सापडल्यामुळे देवळा नगरपंचायतीचे कामकाज बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 13:48 IST

देवळा : येथील नगरपंचायतीचा एक कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह सापडल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने नगरपंचायतीचे कामकाज १३ जुलैपर्यंत बंद ठेवण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी संदीप भोळे यांनी दिली आहे .

देवळा : येथील नगरपंचायतीचा एक कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह सापडल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने नगरपंचायतीचे कामकाज १३ जुलैपर्यंत बंद ठेवण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी संदीप भोळे यांनी दिली आहे . नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना दहा दिवस होम कोरंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला असून भविष्यात कोरोना रूग्णात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी व प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन नगरपंचायत प्रशासनाने केले आहे.आतापर्यंत कोरोना मुक्त असलेल्या तालुक्यात आठवडाभरातच २० कोरोना बाधित रु ग्ण सापडल्यामुळे सर्वत्र काळजीचे वातावरण आहे. शहरात आतापर्यंत १५ कोरोनाचे रूग्ण सापडले आहेत. नगरपंचायतीच्या वतीने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कोरोना बाधित रु ग्ण सापडलेले शहरातील ओमनगर, ज्ञानेश्वरनगर, नविन रोहीदास नगर, व निमगल्ली परीसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. प्रतिबंधित क्षेत्रात औषध फवारणी करण्यात आली असून उर्वरीत शहरातही औषध फवारणी करण्यात येणार आहे. प्रतिबंधित भागातील नागरिकांना आर्सेमिक अल्बम गोळयांचे वाटप करण्यात येत आहे. तहसिलदार दतात्रेय शेजुळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे, मुख्याधिकारी संदीप भोळे, पोलिस निरीक्षक सुहास देशमुख आदीनी प्रतिबंधित क्षेत्रास भेट देऊन तेथिल नागरिकांना सुचना दिल्या.-------------------------------कोरोनासदृश लक्षणे दिसत असलेल्या नागरिकांनी त्वरित जि.प. विद्यानिकेतन येथील कोरोना केअर सेंटरमध्ये जाऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी. शहरातील नागरिकांनी प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या संपर्कात येऊ नये. शहरात कोरोनाचा संसर्ग इतरत्र पसरू नये यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी.-संदीप भोळे, मुख्याधिकारी, नगरपंचायत, देवळा

टॅग्स :Nashikनाशिक