शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

डेेंग्यूचे दीड शतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 01:19 IST

नाशिक : शहरात पावसामुळे जलजन्य आणि अन्य आजारांनी थैमान घातले असून, गेल्या महिन्यात डेंग्यूचे दीड शतक झाले आहे. याशिवाय स्वाइन फ्लूचे १७ रुग्ण आढळले असून, चिकुनगुण्याच्या रुग्णांची संख्या चाळीसवर पोहोचली आहे.

ठळक मुद्देरोगराई सुरूच : स्वाइन फ्लूचे १७ रुग्ण

नाशिक : शहरात पावसामुळे जलजन्य आणि अन्य आजारांनी थैमान घातले असून, गेल्या महिन्यात डेंग्यूचे दीड शतक झाले आहे. याशिवाय स्वाइन फ्लूचे १७ रुग्ण आढळले असून, चिकुनगुण्याच्या रुग्णांची संख्या चाळीसवर पोहोचली आहे.दरवर्षी पावसाळ्यात डासांमुळे डेंग्यू आणि चिकुनगुण्याची साथ पसरते. यंदा जानेवारीपासून आत्तापर्यंत १ हजार १३३ डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळले असून, त्यात आत्तापर्यंत ३६८ पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. गेल्या महिन्यात १४८ रुग्ण आढळले. आत्तापर्यंत डेंग्यूमुळे एकाचाही मृत्यू झाल्याची महापालिकेत नोंद नाही. मात्र, स्वाइन फ्लूमुळे आत्तापर्यंत दोन रुग्ण दगावले आहेत. शहरात गेल्या महिन्यापासून आत्तापर्यंत १७ स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे हेदेखील महापालिकेसमोर आव्हान ठाकले आहे. याशिवाय चिकुनगुण्याचे आत्तापर्यंत ४० रुग्ण आढळले असून, त्यापैकी २१ रुग्ण गेल्या महिन्यात आढळले आहेत. विशेषत: डेंग्यू डासांच्या अळ्यांची उत्पत्ती रोखण्यासाठी एक लाख प्रबोधन पत्रे वाटण्यात आली आहेत. डासांची निर्मिती होत असलेल्या व्यावसायिकांना दंड ठोठावण्यात आला आला आहे. महापालिकेच्या वतीने डास निर्मूलन फवारणी केली जाते. त्याचबरोबर घरांची तपासणी केली असता आजूबाजूच्या घरांमध्येच डास आढळतात. त्यामुळे महापालिकेने आता डासांची उत्पत्ती स्थळे ज्या घरात आढळतील, तेथे प्रति ठिकाण पाचशे रुपये दंड करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.