शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

शहरात डेंग्यूसदृश रुग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:14 IST

पावसाळ्याच्या तोंडावर साथीच्या रोगांची लागण रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने प्रयत्न केले जात असल्याचा दावा केला जात असला तरी, प्रत्यक्षात पंचवटीतील हिरावाडी व इंदिरानगर परिसरातील पांडवनगरी या ठिकाणी डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नाशिक : पावसाळ्याच्या तोंडावर साथीच्या रोगांची लागण रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने प्रयत्न केले जात असल्याचा दावा केला जात असला तरी, प्रत्यक्षात पंचवटीतील हिरावाडी व इंदिरानगर परिसरातील पांडवनगरी या ठिकाणी डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिकेने तातडीने या भागांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.  गेल्या दहा दिवसांत वडाळागावात सांधेदुखी व विषाणू तापाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे पाहून महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्वच्छता मोहीम राबविली तसेच डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे शोधली असता ४६ घरांमध्ये एडिस डासाची उत्पत्ती आढळून आली.  त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने औषध व धूर फवारणी करून डासांची उत्पत्ती नष्ट करण्याचा प्रयत्न युद्धपातळी चालविला असतानाच पांडवनगरी परिसरात दोन डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. पांडवनगरी परिसरात सुमारे ८० इमारती असून, दोन इमारतींदरम्यान मोठ्या प्रमाणात गाजर गवत व केरकचऱ्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच काही ठिकाणी भूमिगत गटारींचे आणि शौचालयाच्या टाकीतील घाण बाहेर डबक्याच्या स्वरूपात साचले असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तातडीने आरोग्य विभागाने संबंधित मिळकतधारकांवर कारवाई करण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहेहिरावाडीत नागरिक भयभीतपंचवटी मलेरिया विभागाच्या वतीने संपूर्ण परिसरात नियमितपणे औषध व धूरफवारणी केल्याचा दावा केला जात असताना हिरावाडीतील (भगवतीनगरला) डेंग्यूसदृश आजाराचे दोन संशयित रुग्ण आढळून आल्याने मनपा प्रशासनाने केलेला दावा फोल ठरला आहे. डेंग्यूसदृश आजाराचे आढळलेले संशयित रुग्ण हे एकाच घरातील असून, ते कोणा एका अधिकाºयाचे नातेवाईक असल्याने खडबडून जागे झालेल्या मनपा प्रशासनाने तत्काळ रुग्ण आढळलेल्या संबंधित ठिकाणी जाऊन परिसरात साफसफाई मोहीम राबविली. तसेच ज्या घरात रुग्ण आढळले आहेत त्या रुग्णांचे रक्त नमुने घेण्यात येऊन ते प्रयोगशाळेत पाठविल्याचे समजते. परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, मनपाच्या संबंधित विभागाकडून केवळ मोजक्याच ठिकाणच्या भागात औषध व धूरफवारणी केली जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :dengueडेंग्यू