शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी बसपाचे विविध मागण्यांप्रश्नी निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:17 IST

मालेगाव : केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांच्या निषेधार्थ व विविध मागण्याप्रश्नी मालेगाव बहुजन समाज पार्टीच्या ...

मालेगाव : केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांच्या निषेधार्थ व विविध मागण्याप्रश्नी मालेगाव बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यलयाच्या आवारात निदर्शने करत आंदोलन केले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांच्या मार्फत राज्यपाल यांना निवेदन सादर करण्यात आले.

अनुसूचित जाती जमातीचे कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण कायम ठेवणे, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, ओबीसीचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यात यावे, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्यात यावा, पेट्रोल डिझेल व गॅसच्या किमती कमी करण्यात याव्यात, खाद्य तेलाचे भाव कमी करावेत, वाढत्या महागाईला आळा घालण्यात यावा, कोरोनामुळे हातघाईस आलेल्या सर्वसामान्य नागरिकांचे वीजबिल माफ करण्यात यावे, कोविडमुळे मृत्यू झालेल्यांच्या परिवारांना आर्थिक मदत देण्यात यावी, राज्यातील १०० टक्के प्राध्यापक भरती प्रचलित १०० बिंदू नामावली विषय विभागनिहाय व्हावी, कोरोना काळात जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या मानधन कर्मचाऱ्यांना शासन निर्णय प्रमाणे कायम आस्थापना सेवेत सामावून घ्यावे, आदी मागण्या आंदोलकांनी यावेळी करण्यात आल्या. आंदोलनात बसपाचे प्रदेश सचिव आनंद आढाव, संतोष शिंदे रफिक सिद्दिकी, राजू जाधव, रमेश निकम, दिलीप पाथरे, सुनील पवार, जहुर भाई, रवींद्र वाघ, रमेश जगताप, दिलीप गवळी, सुमित पवार, आनंद जोगदंड, साईनाथ मगरे, अमोल निकम, उमर भाई, राजेश खरे, संजय जाधव, संतोष भोसले, संजय अहिरे आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

--------------------

मालेगावी विविध मागण्यांप्रश्नी अपर जिल्हाधिकारी आवारात निदर्शने करताना बसपाचे आनंद आढाव, संतोष शिंदे रफिक सिद्दिकी, राजू जाधव, रमेश निकम, दिलीप पाथरे, सुनील पवार, जहुर भाई, रवींद्र वाघ, रमेश जगताप, दिलीप गवळी, सुमित पवार आदी. (१३ मालेगाव बसपा)

130721\13nsk_7_13072021_13.jpg

१३ मालेगाव बसपा