शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी बसपाचे विविध मागण्यांप्रश्नी निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 16:57 IST

मालेगाव : केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांच्या निषेधार्थ व विविध मागण्याप्रश्नी मालेगाव बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी येथील अप्पर जिल्हाअधिकारी कार्यलयाच्या आवारात निदर्शने करत आंदोलन केले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांच्या मार्फत राज्यपाल यांना निवेदन सादर करण्यात आले.

ठळक मुद्देवाढत्या महागाईला आळा घालण्यात यावा.

मालेगाव : केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांच्या निषेधार्थ व विविध मागण्याप्रश्नी मालेगाव बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी येथील अप्पर जिल्हाअधिकारी कार्यलयाच्या आवारात निदर्शने करत आंदोलन केले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांच्या मार्फत राज्यपाल यांना निवेदन सादर करण्यात आले.अनुसूचित जाती जमातीचे कर्मचाऱ्यांना पदोउन्नतीत आरक्षण कायम ठेवणे, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, ओबीसीचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यात यावे, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्यात यावा, पेट्रोल डिझेल व गॅसच्या किमती कमी करण्यात याव्यात, खाद्य तेलाचे भाव कमी करावेत, वाढत्या महागाईला आळा घालण्यात यावा, कोरोना मुळे हातघाईस आलेल्या सर्व सामान्य नागरिकांचे वीजबिल माफ करण्यात यावे, कोविडमुळे मृत्यू झालेल्यांच्या परिवारांना आर्थिक मदत देण्यात यावी, राज्यातील १०० टक्के प्राध्यापक भरती प्रचलित १०० बिंदू नामावली विषय विभाग निहाय व्हावी, कोरोना काळात जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या मानधन कर्मचाऱ्यांना शासन निर्णय प्रमाणे कायम आस्थापना सेवेत सामावून घ्यावे, आदी मागण्या आंदोलकांनी यावेळी करण्यात आल्या. आंदोलनात बसपाचे प्रदेश सचिव आनंद आढाव, संतोष शिंदे रफिक सिद्दीकी, राजू जाधव, रमेश निकम, दिलीप पाथरे, सुनिल पवार, जहुर भाई, रवींद्र वाघ, रमेश जगताप, दिलीप गवळी, सुमित पवार, आनंद जोगदंड, साईनाथ मगरे, अमोल निकम, उमर भाई, राजेश खरे,संजय जाधव, संतोष भोसले, संजय अहिरे आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.मालेगावी विविध मागण्याप्रश्नी अपर जिल्हाधिकारी आवारात निदर्शने करताना बसपाचे आनंद आढाव, संतोष शिंदे रफिक सिद्दीकी, राजू जाधव, रमेश निकम, दिलीप पाथरे, सुनिल पवार, जहुर भाई, रवींद्र वाघ, रमेश जगताप, दिलीप गवळी, सुमित पवार आदी. (१३ मालेगाव बसपा) 

टॅग्स :MalegaonमालेगांवStrikeसंप