सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज संस्थेमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्दबातल केल्यामुळे ओबीसी वर्गात मोडणाऱ्या सर्व जातींवर अन्याय झाला असल्याच्या भावना व्यक्त करण्यात आल्या. राज्य व केंद्र शासनाने ओबीसी आरक्षण पुन्हा कायम होण्यासाठी पुनर्याचिका दाखल करीत ओबीसी समाजाला न्याय मिळवून द्यावा या मागणीसाठी कळवण तालुका तैलिक महासभा व युवक आघाडीच्या वतीने तेली समाजबांधवांनी तहसीलदार बी.ए. कापसे यांना निवेदन दिले. तत्पूर्वी तहसीलदार कार्यालयासमोर तैलिक समाजाच्या वतीने निदर्शने करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
यावेळी ओबीसी घटकांचे आरक्षण कायम करावे, ओबीसी समाजावर अन्याय करू नका, आरक्षण आमच्या हक्काचे या घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी तेली समाजाचे ज्येष्ठ नेते हरिश्चंद्र देसाई, कळवण तालुका अध्यक्ष रविकांत सोनवणे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष उमेश सोनवणे, युवा तालुकाध्यक्ष चेतन बिरार, अभोणा ग्रामपंचायत उपसरपंच भाग्यश्री बिरार, मुरलीधर बागुल, जिल्हा पंच कमिटी सदस्य काशीनाथ वालखडे, कळवण शहर अध्यक्ष विश्वनाथ व्यवहारे, चंद्रकांत सोनवणे, रवि सोनवणे आदी समाज बांधव उपस्थित होते.
फोटो - ०६ कळवण निदर्शने
कळवणला ओबीसी आरक्षणसंदर्भात तहसीलदार कापसे यांना निवेदन देताना हरिश्चंद्र देसाई, रविकांत सोनवणे, उमेश सोनवणे, चेतन बिरार, मुरलीधर बागुल, काशीनाथ वालखडे, विश्वनाथ व्यवहारे आदी.
060721\06nsk_10_06072021_13.jpg
कळवणला ओबीसी आरक्षण संदर्भात तहसीलदार कापसे यांना निवेदन देतांना हरिश्चंद्र देसाई, रविकांत सोनवणे, उमेश सोनवणे, चेतन बिरार, मुरलीधर बागुल, काशिनाथ वालखडे, विश्वनाथ व्यवहारे आदी.