शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

आशा, गटप्रवर्तकांची विभागीय आयुक्त कार्यालयावर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 01:01 IST

आशा व गटप्रवर्तक यांच्या विविध प्रलंबित मागण्या त्वरित पूर्ण करण्यात याव्यात या मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर आयटक महाराष्ट राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने सोमवारी निदर्शने करण्यात आली.

नाशिकरोड : आशा व गटप्रवर्तक यांच्या विविध प्रलंबित मागण्या त्वरित पूर्ण करण्यात याव्यात या मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर आयटक महाराष्टराज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने सोमवारी निदर्शने करण्यात आली.आयटक महाराष्ट राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने आशा व गटप्रवर्तकांच्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात याव्या या मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर राज्य अध्यक्ष राजू देसले यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आाली. उपायुक्त दिलीप स्वामी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्टय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात ग्रामीण ठिकाणी ७० हजार व शहरी भागात १२ हजार आशा तुटपुंज्या मोबदल्यावर काम करीत आहेत. राष्टय आरोग्य अभियान ही केंद्र शासनाची योजना असल्याने आशा व गटप्रवर्तकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. राज्य शासनाने आशा व गट प्रवर्तकांच्या विविध २६ प्रलंबित मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निदर्शन आंदोलनामध्ये जिल्हा सरचिटणीस सुवर्णा मेतकर, जिल्हा संघटक विजय दराडे, राज्य कौन्सिल सदस्या माया घोलप, सुमन बागुल, मनिषा खैरनार, दीपाली कदम, अर्चना गडाख, सुनंदा परदेशी, वैशाली गवळी, रूपाली सानप, सुरेखा खैरनार, ज्योती जाधव, यमुना पवार, स्नेहल उगले, मीना सहारे आदी सहभागी झाले होते.सार्वजनिक आरोग्य ही राज्य शासनाचीदेखील जबादारी असून, या कर्मचाऱ्यांना किमान वेतन, किमान मानधन व इतर सामाजिक सुरक्षा देण्यात आल्या पाहिजेत. आशा व गटप्रवर्तकांना अद्यापही किमान वेतन व मानधनही मिळत नाही. १२ राज्यात आशा कर्मचाºयांना १५०० ते ७५०० मानधन मिळत आहे.

टॅग्स :commissionerआयुक्त