शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

देहविक्रयचा अड्डा पोलिसांकडून उद््ध्वस्त

By admin | Updated: January 17, 2016 23:05 IST

गंजमाळ : व्यवसाय चालविणाऱ्या महिलेसह पाच तरुणी ताब्यात

नाशिक : अनेक वर्षांपासून शहरातील गंजमाळ येथे सुरू असलेला देहविक्रयचा अनधिकृत अड्डा अखेर पोलिसांनी रविवारी (दि.१७) दुपारी उद््ध्वस्त केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये येथील व्यवसाय चालविणाऱ्या मुख्य महिला सूत्रधारासह पाच तरुणींना पोलिसांनी अटक केली आहे.गंजमाळ सिग्नलला लागूनच लाकडी खोल्या व पत्र्यांच्या शेडमध्ये वर्षानुवर्षांपासून बहुसंख्य वेश्या देहविक्रयचा अनधिकृत व्यवसाय करत होत्या. तसेच मद्यविक्रीचेही येथे दुकान असल्यामुळे काही मद्यपींकडून वारंवार भर रस्त्यात गोंधळ घातला जात होता. सिग्नलवर उभ्या राहणाऱ्या वाहनचालकांनादेखील मद्यपींकडून शिवीगाळ केली जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात होता. येथील अवैध व्यवसायाबाबत अनेकदा पोलीस आयुक्त एस.जगन्नाथन यांना तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. जगन्नाथन यांच्या आदेशानुसार पोलीस उपआयुक्त एन.अंबिका, सहायक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्यासह एकूण तीस पोलीस कर्मचाऱ्यांनी गंजमाळ येथील देहविक्रय व्यवसायावर छापा मारला. पोलिसांनी व्यवसाय चालविणाऱ्या सुनीता सुभाष पवार (५०) या मुख्य महिला सूत्रधारासह पाच तरुणींना ताब्यात घेतले आहे. पवारवर भद्रकाली पोलीस ठाण्यात अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या पाचही तरुणींची वात्सल्य महिला वसतिगृहात रवानगी करण्यात आल्याचे कड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)