शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

डाबलीच्या शेतकऱ्यांची अजंग उपकेंद्रासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2022 23:58 IST

वडनेर : मालेगाव तालुक्यातील डाबली येथे सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी अजंग येथील उपकेंद्रासमोर निदर्शने केली.

ठळक मुद्देरात्रीच्या वेळी अंधारात शेतात पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागत आहे.

वडनेर : मालेगाव तालुक्यातील डाबली येथे सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी अजंग येथील उपकेंद्रासमोर निदर्शने केली.डाबली शिवारातील शेतकऱ्यांसाठी येथील विद्युत उपकेंद्रामार्फत आठवड्यातील चार दिवस थ्री फेज विद्युत पुरवठा अपेक्षित असताना तो आठवड्यातून फक्त तीनच दिवस करण्यात येतो. तसेच शिवारात बिबट्याचा वावर अनेकदा आढळून आला. रात्रीच्या वेळी थ्री फेजचा वीजपुरवठा केल्यामुळे रात्रीच्या वेळी अंधारात शेतात पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागत आहे. त्यामुळे बिबट्याची दहशत आहे.विद्युत मंडळाने दिवसा थ्री फेज वीज पुरवावी व शेतकऱ्यांच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवावा, तसेच वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे पिकांचे होत असलेले नुकसान थांबवावे, यासाठी शेकडो शेतकऱ्यांनी विद्युत उपकेंद्रासमोर निदर्शने करीत वीजपुरवठा त्वरित सुरळीत सुरू करण्याची मागणी केली. यावेळी वीज मंडळाचे अधीक्षक अभियंता जयंतीलाल भामरे व उपकार्यकारी अभियंता एम. आर. साळुंखे यांनी घटनास्थळी भेट देऊन निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सरपंच एकनाथ भोसले, पोलीस पाटील दादाजी बच्छाव, वडेलचे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश शेलार यांच्यासह संदीप भोसले, किशोर निकम, संजय निकम, अशोक पाटील, प्रशांत देवरे, छोटू निकम, सुभाष बच्छाव, जगन्नाथ चौधरी आदींसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.