नायगाव : कर्ज माफीसह शेतकऱ्यांच्या हक्काच्या मागण्यांसाठी १ जूनपासून संपावर जाण्याच्या नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या निर्णयाला नायगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. अहमदनगरच्या शेतकऱ्यांपाठोपाठ सिन्नर तालुक्यातील नायगाव खोऱ्यातील शेतकरीही संपावर जाण्यासाठी तयारीला लागल्याचे चित्र आहे. बेभरवशाचे उत्पादन, मातीमोल बाजारभाव, बदलते हवामान अशा विविध कारणांनी वर्षानुवर्षे कर्जाच्या ओझ्याखाली जगणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज माफीसह स्वामिनाथन आयोग लागू करून पिकांना हमीभाव, शेती अवजारे व शेतीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू शंभर टक्के अनुदान देण्यात यावे. यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी येत्या १ जूनपासून पोटापुरतीच शेती पिकविण्याबरोबर बाजारात शेतमाल विक्रीवर बंदी लावण्यासह संपात सहभागी होऊन संप यशस्वी करण्यासाठी शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी जनजागृती करण्याच्या हालचाली नायगाव खोऱ्यात सुरु झाल्या आहेत.(वार्ताहर)
कर्ज माफीसह न्याय हक्कांच्या मागण्या
By admin | Updated: April 6, 2017 00:21 IST