शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

जिल्हाधिकाऱ्यांकडून मागविले स्पष्टीकरण

By admin | Updated: April 9, 2017 00:53 IST

नाशिक : तरुणांना नोकरीचे आमिष दाखविणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयातील रवींद्र मोरे या अव्वल कारकुनाची माहिती पोलिसांनी मागविली आहे.

नाशिक : मालेगाव तालुक्यातील तरुणांना शासकीय नोकरीचे आमिष दाखविणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयातील रवींद्र मोरे या अव्वल कारकुनाची माहिती मालेगावच्या पोलिसांनी मागविली असून, मोरे याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच उमेदवारांना बनावट नियुक्तीपत्रे वाटप केल्याने या साऱ्या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील कूळ कायदा शाखेत अव्वल कारकून असलेल्या रवींद्र मोरे याच्यासह त्याच्या पाच साथीदारांना मालेगाव पोलिसांनी फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक केली असून, मोरे याने जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तांच्या नावे बनावट नियुक्तीपत्रे दिली आहेत. या नियुक्तीपत्रांची सत्यता तपासून पाहण्यास पोलिसांनी सुरुवात केली असून, हस्तगत करण्यात आलेल्या पत्रांची प्रत जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तांकडे पाठवून त्यावर मारण्यात आलेले शिक्के कार्यालयातीलच आहेत काय याची खात्री करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे. गेल्या वर्षीच जिल्हाधिकारी कार्यालयात अशा प्रकारे वाहनचालक तसेच लिपिकांच्या नेमणुकीची नियुक्तीपत्रे वाटप केली जात असल्याची कुणकुण होती, तथापि, प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे रवींद्र मोरे याचे चांगलेच फावले. महसूल खात्यात वाहनचालक म्हणून नोकरी देण्यासाठी मोरे याने सात लाख रुपये घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात राजेंद्र शेवाळे या उमेदवारास नियुक्तीपत्र दिले होते. परंतु या नियुक्तीपत्राविषयी संशय आल्याने शेवाळे याने पोलिसांत धाव घेतली. रवींद्र मोरे याचे सहकारी बंडू बाबुराव सूर्यवंशी, सीताराम निकम, विनायक शेट्टी, श्रीकांत पाळदे या चौघांनाही मालेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (प्रतिनिधी)