शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
2
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
3
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
4
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
5
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
6
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
7
आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."
8
काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video
9
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
10
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?
11
"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल
12
Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?
13
गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
14
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती
15
तुमचेही पैसे रिअल इस्टेटमध्ये अडकलेत का? फक्त १% लोकच कमवतायत नफा! तुम्ही 'या' चुका तर करत नाहीये ना?
16
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
17
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
18
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
19
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
20
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!

टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:08 IST

ग्रामीण भागातून सटाण्यात येणाºया शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थिनी शहरातील टवाळखोर तरुणांना त्रस्त झाल्या असून, या गंभीर प्रकाराचा विद्यार्थिनींच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होत आहे.

सटाणा : ग्रामीण भागातून सटाण्यात येणाºया शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थिनी शहरातील टवाळखोर तरुणांना त्रस्त झाल्या असून, या गंभीर प्रकाराचा विद्यार्थिनींच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होत आहे. सटाणा येथील जिजामाता कन्या विद्यालय परिसरातील दोधेश्वर नाका आणि सटाणा बस स्थानक परिसरात टवाळखोरीचे सर्वाधिक प्रमाण असून यावर अंकुश आणण्यासाठी या परिसरात शाळा, महाविद्यालय सुटण्याच्या वेळेत पोलीस कर्मचाºयाची नेमणूक करण्याची मागणी महाराणा प्रताप क्र ांती दल संघटनेने पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांच्याकडे केली आहे.शहरात शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थिनी येतात. अलीकडच्या काळात महाविद्यालयीन तरु णींची छेड काढण्याचे प्रकार वाढले आहेत. घडलेला प्रकार घरी सांगितल्यावर आपले कुटुंबीय शिक्षण बंद करून टाकतील या भीतीने अनेक विद्यार्थिनी हा प्रकार निमूटपणे सहन करतात . एखाद्या विद्यार्थिनीने याबाबत घरी तक्र ार केल्यावर तिचे पालक तिच्या सोबत आलेच तर त्यांना देखील टवाळखोरांकडून दमदाटी केली जात आहे. नुकत्याच झालेल्या एका बैठकीत पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी स्वत: याबाबत लक्ष घालून पोलीस कर्मचारी नेमण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापपर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी तरसाळीचे प्रभारी सरपंच लखन पवार, नाना मोरकर, प्रभाकर पवार, प्रवीण चव्हाण, सुनील पवार, भाजप युवती तालुकाध्यक्ष रु पाली पंडित, नाना गोसावी, अतुल धुमाळ, विलास अहीरे, अनिल पवार आदि उपस्थित होते.