शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:19 IST

नाशिक : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना ऑक्सिजनअभावी रुग्णालयांकडून रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेतले जात नसल्याचे प्रकार घडत ...

नाशिक : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना ऑक्सिजनअभावी रुग्णालयांकडून रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेतले जात नसल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे शहरातील रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्याची मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहे.

--

खाद्यतेल महागले, सामान्यांचे बजेट कोलमडले

नाशिक : खाद्यतेलाच्या किमती महागल्याने सर्वसामान्य कुटुंबांच्या स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले आहे. सध्या खाद्यतेल दीडशे ते १९० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचल्याने सामान्य कुटुंबांना महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

--

कोरोना रुग्णावर डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच उपचार

नाशिक : शहरातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे रुग्णालयांमध्ये खाटा मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेक नातेवाईक रुग्णांवर डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच उपचार करीत आहेत. परंतु, असे करताना रुग्णांना तपासणीसाठी नेताना आणताना नातेवाईक रुग्णांच्या संपर्कात येत असल्याने त्यांनाही कोरोनाची बाधा होण्याचा धोका वाढला आहे.

--

शेतकऱ्यांकडून कांद्याची हातविक्री

नाशिक : कोरोनामुळे कांदा व्यापार थंडावला असून कांद्याचे भावही सातत्याने घसरू लागले आहे. त्यामुळे काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी शहरातील विविध भागांत वाहनांमधून अथवा भाजीबाजारात हातविक्रीने कांद्याची विक्री सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळत असले तरी मोठ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची काद्याचे भाव घसरल्याने अडचण झाली आहे.

---

कोरोना चाचण्या वाढविण्याची मागणी

नाशिक : वाढत्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांच्या कोरोना चाचण्या वाढविण्याची मागणी आरोग्यक्षेत्रात कार्यरत सामाजिक संस्थांनी केली आहे. अनेक रुग्णांमध्ये कोरानाची लक्षणे नसल्याने ते खुलेआम फिरत असून कोरोनाच्या प्रसारास कारणीभूत ठरत आहेत. अशा नागरिकांच्या चाचण्या करून बाधित रुग्णांच्या विलगीकरणाची सोय करण्याची मागणीही सामाजिक संस्थांकडून होत आहे.

---

शहरातील रस्त्यांवर गर्दी कायम

नाशिक : शहरातील बाजारपेठा बंद असल्या तरी रस्त्यावरील गर्दी मात्र कायम आहे. अनेक नागरिक कोरोनाच्या संकटातही घराबाहेर पडत असून काही नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालनही होत नाही. त्यामुळे अशाप्रकारे विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सामाजिक संस्थांकडून होत आहे.