शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

थकबाकीदारांच्या शेतजमिनींचे लिलाव थांबविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 00:18 IST

येवला : नासिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १९ मार्चला जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे लिलाव करण्याचे निश्चित केल्याने शेतकऱ्यांना धडकी भरली आहे. सदर शेतजमिनीचे लिलाव थांबवावे अन्यथा कर्जबाजारी शेतकऱ्यांसोबत आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनेने एका निवेदनाद्वारे दिला आहे.

ठळक मुद्देशेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना निवेदन

येवला : नासिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १९ मार्चला जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे लिलाव करण्याचे निश्चित केल्याने शेतकऱ्यांना धडकी भरली आहे. सदर शेतजमिनीचे लिलाव थांबवावे अन्यथा कर्जबाजारी शेतकऱ्यांसोबत आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनेने एका निवेदनाद्वारे दिला आहे.शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना निवेदन देत शेतकऱ्यांची कैफीयत मांडली. राष्ट्रीयीकृत बँकांनी योजना राबवून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला, व्याज माफ करून बऱ्याच शेतकऱ्यांना मुद्दल रकमेत सुद्धा काही प्रमाणात सूट दिली. मात्र, शेतक-यांनी स्थापन केलेल्या नासिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकरी मुक्त बँक करण्याचे धोरण राबवत असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांकडून विज वितरण कंपनीही वीजबिलांची वसुली करत आहे. वीज वितरण कंपनीनेही वीजपुरवठा तोडण्याची मोहिम तात्काळ थांबवावी, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, संतू पाटील झांबरे, रामकृष्ण बोंबले, शंकराव पुरकर, शंकराव ढिकले, बाळासाहेब गायकवाड, अरुण जाधव, देविदास पवार, बापूसाहेब पगारे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.अन्यथा आंदोलनाचा इशाराजिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचेशी शेतकरी संघटना पदाधिकार्‍यांनी सविस्तर चर्चा करून शेतकर्‍यांच्या बाबतीत योग्य मार्ग काढावा असे आवाहन केले. अन्यथा १९ मार्चला नाशिक जिल्हा बँकेवर थकीत कर्जदार शेतकरी आणि शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आंदोलन छेडतील असा इशारा देण्यात आला. 

टॅग्स :electricityवीजFarmerशेतकरी