शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव ते साकुरफाटा रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची निवेदनाद्वारे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 18:25 IST

घोटी : पिंपळगाव मोर ते साकुर फाटा मार्गे पांढुर्ली पर्यंत या रस्त्यावर खूप खड्डे आहे. सदर खड्डे त्वरीत बुजविण्याकरीता रॉट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देवाहनचालकांना प्रवाशांना होत असलेला धुळीचा त्रास थांबवावा

घोटी : पिंपळगाव मोर ते साकुर फाटा मार्गे पांढुर्ली पर्यंत या रस्त्यावर खूप खड्डे आहे. सदर खड्डे त्वरीत बुजविण्याकरीता रॉट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.सिन्नर - घोटी या महामार्गावरील घोटी ते पिंपळगाव दरम्यान रस्त्याचे कॉँक्रीटीकरणाचे कामकाज चालू आहे, परंतु पिंपळगाव मोर ते साकुर फाटा मार्गे पांढुर्ली पर्यंत या रस्त्यावर खूप खड्डे आहे.सदर खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने बुजवावे व रस्त्यावरील वाहतुकीत वाहनचालकांना प्रवाशांना होत असलेला धुळीचा त्रास थांबवावा यासंदर्भात शनिवारी (दि. ४) रोजी इगतपुरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गाढवे, माजी पंचायत समिती उपसभापती पांडुरंग वारु ंगसे यांच्या शिष्टमंडळाकडून इगतपुरी नायब तहसीलदार राजेंद्र कांबळे यांना निवेदन देण्यात आले.दरम्यान घोटी-सिन्नर महामार्ग संदर्भात पिंपळगाव मोर ते साकुरफाटा या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे सदर रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून दैनंदिन प्रवासधारक प्रवास करतात त्यात प्रामुख्याने शेतकरी वर्ग तसेच नोकरदार, महाविद्यालयात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, शेतकरी, दूध विक्र ेते, व्यापारी या सर्वांना साकुर ते पिंपळगाव मोर मार्गे घोटी या रस्त्यावरून प्रवास करतांना रोजच धुळीचा व प्रचंड खड्यांचा त्रास सहन करावा लागतो.तसेच याच रस्त्यालगत धामणगाव दरम्यान एसएमबीटी रु ग्णालय येत असून याच रस्त्यावरून एसएमबीटी रु ग्णालयात सतत उपचारासाठी रु ग्णांची ये जा सुरू असते या रस्त्यावरील जीवघेण्या खड्यांमुळे रु ग्णालयात जाणाऱ्या रु ग्णांना देखील सर्रासपणे या खड्डेमय रस्त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.निवेदन देतेवेळी तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, माजी पंचायत समिती सदस्य पांडुरंग वारु ंगसे, निवृत्ती जाधव, गेणू गाढवे, राम शिंदे, प्रा.विलास खापरे, साहेबराव लगड, नवनाथ लगड आदींसह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.प्रतिक्रि याघोटी-सिन्नर या महामार्गावरील पिंपळगाव ते साकुर फाटा पांढुरली दरम्यान रस्त्यावर जीवघेणे खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून या रस्त्यावरून दररोज ये जा करणार्या प्रवासी वाहनधारकांना जीवघेण्या प्रवासाबरोबरच धुळीचा प्रचंड सामना करावा लागत आहे तरी संबंधित रस्ता प्रशासनाने या रस्त्यावरील खड्डे व धूळ प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अन्यथा राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.- बाळासाहेब गाढवे (तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉँग्रेस) 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागTrafficवाहतूक कोंडी