शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भरवज-निरपण भागात बस सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 16:59 IST

ग्रामस्थांचे निवेदन : आठ वर्षांपासून बससेवा बंद

ठळक मुद्दे नाशिक ते इगतपुरी मार्गावर एसटी बससेवेचे वेळापत्रक कोलमडल्याने बसफेऱ्या वाढवून देण्याची विनंतीही करण्यात आली आहे

घोटी : गेल्या आठ वर्षांपासून इगतपुरी तालुक्यातील दुर्गम आदिवासी भाग असलेल्या भरवज-निरपण भागातील एसटी बससेवा बंद आहे. यामुळे दैनंदिन कामगार, शालेय विद्यार्थी आणि आदिवासी ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होत आहे. या भागातील आदिवासी ग्रामस्थांना बसशिवाय पर्याय नसल्याने तातडीने बससेवा सुरू करावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने भरवज-निरपण करण्यात आली आहे.इगतपुरीचे आगार प्रमुख संदीप पाटील यांना निवेदन देऊन बंद पडलेली बससेवा सुरू करण्याची आग्रही मागणी करण्यात आली. याशिवाय, नाशिक ते इगतपुरी मार्गावर एसटी बससेवेचे वेळापत्रक कोलमडल्याने बसफेऱ्या वाढवून देण्याची विनंतीही करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, भरवज-निरपण परिसरातील गावांतून तालुक्याच्या ठिकाणी आणि घोटी, नाशिक येथे शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, सरकारी कामे, हॉस्पिटलमध्ये उपचार, बाजारपेठा व अन्य कामांसाठी जाणारे नागरिक आदी प्रवाशांची संख्या मोठी आहे. आठ वर्षांपूर्वी याठिकाणी बससेवा सुरू होती. परंतु, बससेवा बंद केल्याने प्रवाशांना खाजगी वाहनाने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. परिसरातील प्रवाशांसाठी सकाळी ८, दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता बस सुरू करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी भरवज निरपण ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच कृष्णा घारे, नथु घारे, लक्ष्मण मेमाणे, पोपट घारे, किसन घारे, किसन येडे, कुंडलिक तिटकारे, सीताबाई सुकरे, ठकुबाई मेमाणे, सखुबाई केकरे, लिलाबाई मेमाणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक