नाशिक : पंचवटी परिसरात ठाण मांडलेल्या भिकाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात येणाºया भाविकांनादेखील त्याचा त्रास सहन करावा लागतो. मनपा व पोलीस प्रशासनाने पंचवटी परिसरातील भिकारी व निराधारांची पडताळणी करून निराधारांच्या सोयीसाठी निराधार संकुल उभारण्याची मागणी पोलीस आयुक्त व मनपा आयुक्त यांच्याकडे पंचवटी युवक विकास समितीच्या वतीने करण्यात आली आहे.पंचवटी परिसरातील रामकुंड, कपालेश्वर, राममंदिर, सीतागुंफा, गणेशवाडी परिसरातील भाजीमार्केटमध्ये ठाण मांडलेल्या भिकाऱ्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. या लोकांमध्ये काही अंध, अपंग, निराधार, वृद्ध आहेत, पण काही लोक जाणूनबुजून भिकारी असल्याचे भासवून येणाºया भाविकांकडे पैशांची मागणी करून नाहक त्रास देतात त्यामुळे शहराची वाईट प्रतिमा तयार होते.शहराच्या बाहेरील गुन्हेगारदेखील भिकाºयांच्या समवेत वावरण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय गरजूंचे ऊन, वारा, पाऊस यापासून रक्षण व्हावे यासाठी निराधार संकुल उभारून त्याठिकाणी त्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी पंचवटी युवक विकास समितीचे कार्याध्यक्ष किरण पानकर, उपाध्यक्ष धनंजय कोठुळे, सरचिटणीस सचिन दप्तरे, खजिनदार अजित पाटील, चिटणीस संतोष जगताप आदींनी केली आहे.
पंचवटीत निराधार संकुल उभारण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 00:12 IST