शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गोसावी समाज दफनभूमीसाठी हिवरे येथे जागा देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 21:54 IST

सिन्नर : दशमान गोसावी समाजाच्या दफनभूमीसाठी हिवरे ग्रामपंचायतीने गावाच्या बाहेरील ग्रामपंचायतीच्या बखळ जागेत जागा द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन समाजाच्या वतीने सरपंचासह प्रशासनाला देण्यात आले.

ठळक मुद्दे आजपर्यंत कुठलाही निर्णय झाला नसल्याकडेही निवेदनात लक्ष वेधण्यात आले.

सिन्नर : दशमान गोसावी समाजाच्या दफनभूमीसाठी हिवरे ग्रामपंचायतीने गावाच्या बाहेरील ग्रामपंचायतीच्या बखळ जागेत जागा द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन समाजाच्या वतीने सरपंचासह प्रशासनाला देण्यात आले.समाजाच्या वतीने गेल्या १५ वर्षांपासून दफनभूमीसाठी जागेची मागणी करण्यात येत आहे. अनेकदा ग्रामस्थांमध्येही याबाबत चर्चा झाली आहे; मात्र ग्रामपंचायत प्रशासनाकडून याबाबत कुठलाही निर्णय होत नसल्याने निवेदनात आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे. दफनभूमीची सध्याची असलेली जागा खूपच कमी पडत असून, समाजातील कुणाचे निधन झालेच तर समाधीसाठी जागा शिल्लक राहिलेली नाही.सरपंच विमल बिन्नर व ग्रामसेवक किशोर विभूते यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी गोसावी समाजाच्या मागणीवर लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन बिन्नर यांनी दिले. ही जागा देण्यात शासकीय स्तरावर काही अडचणी असून, या अडचणी लवकरात लवकर दूर करून जागा देण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे विभूते यांनी स्पष्ट केले.यावेळी उपसरपंच त्र्यंबक आगविले, ग्रामपंचायत सदस्य रामनाथ बिन्नर, पोपट बिन्नर, सुनील गोसावी, मंगल गोसावी, माधव गोसावी, सचिन गोसावी, सदाशिव गोसावी, सुनंदा गोसावी, ज्ञानेश्वर गोसावी, विलास गोसावी यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. प्रशासनाला निवेदन; मागण्यांकडे वेधले लक्षभविष्यात अजून अडचण वाढू नये यासाठी ग्रामपंचायतीने आपल्या बखळ जागेतील १० गुंठे जागा समाजाच्या दफनभूमीसाठी द्यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यासंदर्भात ग्रामसेवकांना ३० आॅगस्ट २०१८ रोजीही निवेदन देण्यात आले होते; मात्र त्यावर आजपर्यंत कुठलाही निर्णय झाला नसल्याकडेही निवेदनात लक्ष वेधण्यात आले.