खामखेडा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली बससेवा अनलॉक प्रक्रियेत सुरू करण्यात आली, मात्र अद्यापही ग्रामीण भागात बससेवा नियमित सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सटाणा-सावकी-खामखेडा या ग्रामीण भागातील बससेवा त्वरित सुरू करण्याची मागणी करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सटाणा आगार व्यवस्थापकांना निवेदन दिले आहे.अनलॉक प्रक्रियेत बससेवा सुरू करण्यात आली. नववी ते बारावीपर्यंत विद्यालये सुरु झाली आहेत. ग्रामीण भागातील बससेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ग्रामीण भागातील बससेवा सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे, त्यामुळे सटाणा-सावकी-खामखेडा बस सेवा सुरू करावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने निवेदनातून केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.निवेदनावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे देवळा तालुका उपाध्यक्ष धनंजय बोरसे, प्रभाकर बोरसे, रईस पटेल, शकलेन पटेल, शोएब पटेल, पंकज बच्छाव, रोहित सोनवणे, अतुल गांगुर्डे, पवन सोनवणे, किरण सोनवणे, समीर बोरसे, राहुल शेवाळे, तेजल मोरे, कामिल पटेल, नहिम शेख, सत्यजित धिवरे, योजना सोनवणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सटाणा-सावकी-खामखेडा बससेवेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 18:10 IST
खामखेडा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली बससेवा अनलॉक प्रक्रियेत सुरू करण्यात आली, मात्र अद्यापही ग्रामीण भागात बससेवा नियमित सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सटाणा-सावकी-खामखेडा या ग्रामीण भागातील बससेवा त्वरित सुरू करण्याची मागणी करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सटाणा आगार व्यवस्थापकांना निवेदन दिले आहे.
सटाणा-सावकी-खामखेडा बससेवेची मागणी
ठळक मुद्देराष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सटाणा आगार व्यवस्थापकांना निवेदन सादर