नाशिक : ज्येष्ठ नेते अॅड़ गोविंद पानसरे यांच्या हत्त्येसंदर्भात पोलिसांनी सनातन संस्थेचा कार्यकर्ता संशयित समीर गायकवाड यास ताब्यात घेतले आहे़ या पार्श्वभूमीवर सिंहस्थ कुंभमेळ्यात आलेल्या सनातन संस्थेच्या कार्यकर्त्यांची कसून चौकशी करण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव राजू देसले यांनी पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे़निवेदनात नाशिकमधील सिंहस्थासाठी सनातनचे हजारो कार्यकर्ते आलेले असून, मोठ्या प्रमाणावर साहित्य विक्री करीत आहेत़ साधुग्राम व रामकुंड परिसरात मोठ्या प्रमाणावर बॅनर्स, होर्डिंग अनधिकृतपणे लावलेले असून, ते त्वरित जप्त करण्यात यावेत़ तसेच या कार्यकर्त्यांची चौकशी करावी , असेही निवेदनात म्हटले आहे़ यावेळी भाकपचे शहर सचिव दत्तू तुपे, सहसचिव राजपाल शिंदे, आयटक कामगार संघटनेचे जिल्हा संघटक विजय दराडे, किसान सभेचे नेते निवृत्ती कसबे आदि उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
सनातन कार्यकर्त्यांच्या चौकशीची मागणी
By admin | Updated: September 23, 2015 00:05 IST