नाशिक : जिल्'ातील पूर्व भागातील काही तालुके वगळता सर्वत्र बेमोसमी व अवकाळी पाऊस झाला असून, त्यामुळे रब्बी पिकांना थोड्या प्रमाणात; मात्र कांदा, द्राक्षांसह अन्य पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती केदा अहेर यांनी देवळा तालुक्यासह जिल्'ातील अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात येणार असल्याची माहिती दिली. गेल्या दोन दिवसांत जिल्'ात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे. नाशिक शहरात तर शुक्रवारी दुपारनंतर पावसाने चांगलीच हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा, उघड्यावरील कांदा तसेच द्राक्षबागांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. देवळा व चांदवड तालुक्यात कांदा व अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसान झालेल्या शेतपिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी आपण राज्य सरकारकडे करणार असल्याचे केदा अहेर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
बेमोसमी पावसाने रब्बीचे नुकसान पंचनामे करण्याची केदा अहेरांची मागणी
By admin | Updated: November 15, 2014 00:16 IST