शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीसाठी शासनाकडे ३८ कोटींची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:23 IST

फेब्रुवारी महिन्यापासून वाढलेला कोराेना अजूनही कायम असला तरी बाधितांची संख्या कमी होत आहे. मात्र, त्या आधीच राज्य शासनाने आता ...

फेब्रुवारी महिन्यापासून वाढलेला कोराेना अजूनही कायम असला तरी बाधितांची संख्या कमी होत आहे. मात्र, त्या आधीच राज्य शासनाने आता तिसऱ्या लाटेची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या सुमारास अशाप्रकारची लाट येऊ शकते हे गृहीत धरून राज्य शासनाने नियोजन करण्याचे आदेश महापालिकांना दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने काम सुरू केल्याची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी लोकमतला दिली.

सध्या काेरोना बाधितांवर उपचार करताना ज्या उणिवा भासत आहेत. त्याचा विचार करून नियोजन करण्यात येत आहे. सध्या एका दिवसाला सुमारे एक कोटीहून अधिक रक्कम कोरोना उपचार आणि व्यवस्थापनावर खर्च होत आहे. त्यामुळे नव्या लाटेची तयारी करण्यासाठी राज्य शासनाकडून ३८ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. महापालिकेच्या बिटको आणि झाकीर हुसेन रुग्णालयात मिळून सुमारे एक हजार रुग्ण दाखल असतात आणि त्यांच्यावर उपचार होत असतात आणि तिसऱ्या लाटेत आणखी अडचणी नको म्हणून महापालिकेने आत्तापासून नियोजन करताना दोन ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू करण्याची तयारी केली आहे. त्यांची क्षमता सुमारे १४ किलो लिटर्स प्रतिदिन असेल असे आयुक्तांनी सांगितले. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण उद्‌भवणार नाही. नवीन रुग्णालये आणि कोविड सेंटर्सचे देखील नियोजन करण्यात येणार आहे.

कोट...

महापालिकेच्या दोन्ही रुग्णालयांमध्ये हजारो रुग्णांवर उपचार करण्यात आले. डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीचा एक अपघात वगळता गालबाेट लागले नाही. ऑक्सिजन शिल्लक नाही म्हणून रुग्णांना स्थलांतरित करण्याची नामुष्की आली नाही. रेमडेसिविरचा पुरवठा नियमित होता आता संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही उणिवा जाणवू नये यादृष्टीने नियोजन सुरू आहे.

- कैलास जाधव, आयुक्त महापालिका

इन्फो...

कोरियातून लवकरच दाखल होणार

महापालिकेच्या वतीने साडेबाराशे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्यात आले आहे. कोरियातून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पाठवण्यात येेत असून येत्या शनिवारपर्यंत (दि.८) ते दाखल होतील. त्यामुळे अगोदरचे दोनशे आणि आत्ताचे साडेबाराशे असे सुमारे साडेचौदाशे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध होणार आहेत. राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध असणारी नाशिक महापालिका पहिलीच असणार आहे.