शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

वैतरणा परिसरातील खराब वीज खांब बदलण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 17:30 IST

वैतरणानगर : इगतपुरी तालुक्यातील वैतरणा परिसरातील बहुतांशी विज वाहक खांब जीर्ण झालेले असुन मोडकळीस आले आहे. तरी देखील विज वितरण विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने विज वितरण विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देअधिकार्यांचे व कर्मचार्यांचे दर्शनही दुर्मिळच

वैतरणानगर : इगतपुरी तालुक्यातील वैतरणा परिसरातील बहुतांशी विज वाहक खांब जीर्ण झालेले असुन मोडकळीस आले आहे. तरी देखील विज वितरण विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने विज वितरण विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे.वैतरणा परिसरात विज निर्मिती प्रकल्प असुन विज वितरण विभागाची ३३ के व्ही व ११ केव्ही विधुत वाहक स्वतंत्र्य लाईन गेलेल्या आहेत. या लाईन शेतकर्यांच्या शेता शेतातुन गेलेल्या असुन अक्षरशा खाब जिर्ण होऊन मोडकळीस आले आहे. यामुळे विधुत वाहक तारा खाली लोंबलेल्या असुन पावसाळ्यातील सोसाट्याच्या वार्यामध्ये कोणत्याही क्षणी पडु शकतात त्यामुळे विज वितरण विभागाने मोडकळीस आलेले खांब बदलने आवश्यक आहे. मात्र सुस्त असलेले विज वितरण विभाग या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत असते. पावसाळ्यामध्ये विज पुरवठा खंडीत झाल्यानंतरच यांचे कर्मचारी या परिसरात फिरताना दिसता अन्यथा यांच्या अधिकार्यांचे व कर्मचार्यांचे दर्शनही दुर्मिळच असते.पावसाळ्यामध्ये घरोघरी विजेच्या मोठ्या प्रमाणात आवश्यकता असता. मात्र विज वितरण विभाग उन्हाळा व हिवाळा कार्यालयात बसुन विज बिलांचे नियोजन करत असताता आण िपावसाळ्यापुर्वी अपेक्षति असणाऱ्या कामाकडे दुर्लक्ष करून विज पुरवठा खंडीत झाल्यानंतर काम करायचे याची वाट बघत असतात.विज वितरण विभागाने नुकतेच तालुक्यात मोठ्या प्रमाणात अव्वाचे सव्वा बिले देऊन सर्वसामान्याना हैराण केले आहे. पावसाळ्यात विज पुरवठा खंडीत होऊ नये यासाठी तरी उपाययोजना करावी अशी मागणी नागरीक करत आहे.

माङया शेतामधुनच ११ केव्ही ची विज वितरण विभागाची मेन लाईन गेलेली असुन माझ्या शेतात असणाºया विज वितरण विभागाचा विधुत वाहक खांब पुर्णपणे जिर्ण झालेला असुन मोडकळीस आलेला आहे. कोणत्याही क्षणी येथील खांब कोसळु शकतो या खांबाला बदलने गरजेचे असुन या खांबा जवळ माझे घर असल्याने आमच्या जिवीतास यापासुन धोका आहे.- विश्वनाथ खातळेशेतकरी, ओंडली. 

टॅग्स :Farmerशेतकरीelectricityवीज