मनमाड : पालिकेच्या सभेत विरोध असलेला शॉपिंग सेंटरचा ठराव तहकूब करण्यात आला होता. मात्र नंतर इतिवृत्तात त्याची बेकायदेशीररीत्या नोंद केल्याचा आरोप करत सदरचा ठराव रद्द करण्यात यावा, अशी मागणी कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, दि. १५ फेब्रुवारी रोजी नगरपालिकेचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सभेसमोर असलेल्या विषयावर विचारविनिमय करण्यासाठी मीटिंग बोलविण्यात आली होती. मनमाड न.प. हद्दीत १४व्या वित्त आयोगाअंतर्गत साइट क्रमांक ३५ मध्ये दुकान केंद्राचे बांधकाम करणेच्या सुधारित आराखड्यास व अंदाजपत्रकास मजुरी देणेबाबत ठराव चर्चेस आल्यानंतर कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी विरोध करण्यास सुरुवात केली. शहराला शॉपिंग सेंटरची गरज नसून पिण्याच्या पाण्याची आवश्यकता आहे. गाळे बांधण्याऐवजी सदरची रक्कम करंजवण पाणी योजनेकडे वर्ग करण्यात यावी, अशी मागणी लावून धरण्यात आली. पीठासीन अधिकाºयांनी विषय क्र. १० ज्यादा चर्चेसाठी तहकूब केला. मात्र नंतर माहिती मिळाली की, तो बेकायदेशीररीत्या सदर ठराव इतिवृत्त बुकात नोंद करण्यात आला आहे. म्हणून सदरचा ठराव रद्द करण्याची मागणी करण्यात आली. जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनावर कॉँग्रेस नगरसेवक रवींद्र घोडेस्वार, संतोष अहिरे, सीमा निकम, मिलिंद उबाळे, नाजीम शेख यांच्यासह अर्चना जाधव, मेरी पिटर थॉमस यांच्या स्वाक्षºया आहे. दरम्यान सदरचे शॉॅपिंग सेंटरचे काम रद्द करून करंजवण योजनेसाठी निधी वापरण्यात यावा या मागणीसाठी गेल्या आठवड्यात कॉँग्रेस शहर अध्यक्ष अफजलभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले होते.
बेकायदेशीर ठराव रद्द करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 00:49 IST
मनमाड : पालिकेच्या सभेत विरोध असलेला शॉपिंग सेंटरचा ठराव तहकूब करण्यात आला होता. मात्र नंतर इतिवृत्तात त्याची बेकायदेशीररीत्या नोंद केल्याचा आरोप करत सदरचा ठराव रद्द करण्यात यावा, अशी मागणी कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बेकायदेशीर ठराव रद्द करण्याची मागणी
ठळक मुद्देमनमाड। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन