शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

गिरणा धरणाच्या कालव्यांसह पाटचाऱ्यांच्या दुरुस्तीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:12 IST

नांदगाव : तालुक्यातील महत्त्वाचे धरण असलेल्या गिरणा धरणाच्या कालव्यांसह पाटचाऱ्यांच्या दुरुस्तीकडे पाटबंधारे विभागाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने गळती होऊन ...

नांदगाव : तालुक्यातील महत्त्वाचे धरण असलेल्या गिरणा धरणाच्या कालव्यांसह पाटचाऱ्यांच्या दुरुस्तीकडे पाटबंधारे विभागाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने गळती होऊन मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत आहे. सदर दुरुस्तीकडे लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

सन १९५५ मध्ये धरण बांधकामासाठी कुदळ मारली गेली. या पायाभरणी समारंभाला पंतप्रधान पंडित नेहरू यांनी हजेरी लावली होती. १४ वर्ष सलग काम झाल्यावर १९६९ मध्ये धरणाचे लोकार्पण झाले. गिरणा प्रकल्प नांदगाव तालुक्यात असला तरी सिंचनासह पिण्याच्या पाण्यासाठी सर्वाधिक फायदा जळगाव जिल्ह्याला होतो. त्याचा बांधकाम खर्च १३ कोटी रुपये झाला होता. गिरणा धरणापासून निघालेला डावा पांझण कालवा ५३ कि.मी. लांबीचा, उजवा जामदा २० कि.मी.चा, डावा जामदा ४० कि.मी. तर चातर निम्न गिरणा काठ कालवा ६० कि.मी. लांबीचा आहे. या कालव्यांमुळे गिरणा खोऱ्याला सुपीकता व समृद्धता लाभली आहे. तथापि कालव्यांपासून होणारी गळती, पाटचा‍ऱ्यांच्या दुरुस्तीची गरज हे प्रश्न सोडविणे गरजेचे बनले आहे. यामुळे पाण्याचा अपव्यय होतो. याकडे गिरणा पाटबंधारे विभागाचे सतत दुर्लक्ष होत असते. गिरणा धरणातून मालेगाव शहर, नांदगावसह ५६ खेडी अशा एकूण १२७ पाणीपुरवठा योजना आहेत. जळगाव जिल्ह्याच्या सुमारे ७५ टक्के लोकसंख्येची यावर तहान भागते. सदर धरणाच्या कालव्यासह पाटचाऱ्यांची तातडीने दुरूस्ती व्हावी, अशी मागणी होत आहे.

फोटो- २८ गिरणा डॅम

सन १९५५ मध्ये गिरणा धरणाच्या पायाभरणी समारंभप्रसंगी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू. (संग्रहित छायाचित्र माजी आमदार अनिल अहेर यांच्या सौजन्याने)

===Photopath===

280521\28nsk_37_28052021_13.jpg

===Caption===

फोटो- २८ गिरणा डॅमसन १९५५ मध्ये गिरणा धरणाच्या पाया भरणी समारंभप्रसंगी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू. (संग्रहित छायाचित्र माजी आमदार अनिल अहेर यांच्या सौजन्याने)