शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांवरील बॅरिकेड्स‌ हटविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:12 IST

नाशिक : शहरातील इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड भागांतील रस्त्यांवर तसेच रस्त्यांच्या कडेला कोरोना काळात गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी ...

नाशिक : शहरातील इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड भागांतील रस्त्यांवर तसेच रस्त्यांच्या कडेला कोरोना काळात गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी उभे केलेले बॅरिकेड्स‌ बेवारसपणे पडून आहेत. आता शहरातील निर्बंध काही प्रमाणात शिथिल होत असताना हे बॅरिकेड्स, तसेच पडून असल्याने बेवारस पडलेले बॅरिकेड्स‌ हटविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

--

बेशिस्त दुचाकीस्वार पुन्हा जोरात

नाशिक : जिल्ह्यात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन सोमवारी संपुष्टात येताच रस्त्यावर सुसाट वेगाने धावणाऱ्या बेशिस्त दुचाकीस्वारांची बेफिकिरी दिसून आली. शहरातील वडाळा, पाथर्डजी रोड, रविशंकर मार्ग, कॉलेज रोड, मुंबई नाका, द्वारका तसेच नाशिकरोड भागात अनेक दुचाकीस्वार रस्त्यावर स्टंटबाजी करीत धिगांणा घालताना दिसून येत आहे. अशा बेशिस्त दुचाकीस्वारांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

--

आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा

नाशिक : शहरातील रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. मागील काही महिन्यांपासून रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला होता. यामुळे अनेकांना साप्ताहिक सुटी किंवा रजा घेणेही कठीण झाले होते. मात्र, आता रुग्णसंख्या कमी होत असताना नवीन रुग्णांचे प्रमाणही कमी झाल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे.

--

शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी

नाशिक : चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील अनेक आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीस आलेला केशर, हापूस आंबा वादळामुळे गळून पडल्याने त्याचे नुकसान झाले आहे. विशेषत: आदिवासी भागात त्याचे प्रमाण अधिक असल्याने या शेतकऱ्यांना शासनाने मदत द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

--

किरकोळ भाजीविक्रेत्यांसमोर समस्या

नाशिक : शहरातील कडक निर्बंध काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढली असून, शहरातील किरकोळ भाजीविक्रेत्यांनाही मुबलक माल उपलब्ध होत आहे. मात्र, विक्रेत्यांना मनपाने ठरवून दिलेल्या जागेतच भाजीविक्री करावी लागत आहे. मात्र, अशा नवीन ठिकाणी नियमित ग्राहक येत नाही, त्यामु‌‌ळे अपेक्षित व्यावसाय होत नसल्याने भाजी विक्रेत्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

--

शहरात अवैध मद्यविक्री जोरात

नाशिक : लॉकडाऊनमुळे मद्यविक्रीची दुकाने बंद असल्याने अवैध मद्यविक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अनेक भागांत सर्रासपणे अवैध मद्यविक्री केली जाते. पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. अवैध मद्यविक्रीला पोलिसांनी आळा घालावा, अशी मागणी करण्यात येत आहे. अनेक ठिकाणे पोलिसांना माहिती असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

--

हॉटेल चालकांसमोर विविध अडचणी

नाशिक : मागील वर्षापासून अडचणीत सापडलेल्या हॉटेल उद्योगाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही व्यावसायिकांनी तर हॉटेल बंद करणे पसंत केले आहे. हॉटेलचे मेन्टेनन्स आणि स्टाफ सांभाळणे अनेकांना कठीण झाले आहे. लॉकडाऊन उघडल्यानंतरही ग्राहक येतात की नाही, याबाबतही साशंकता व्यक्त केली जात असल्याने सध्यातरी पर्यायी व्यवसाय करण्याचा विचार अनेक जण करीत आहेत.

--