शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

किकवारी तलाठ्याची चौकशीची मागणी

By admin | Updated: November 27, 2015 23:58 IST

किकवारी तलाठ्याची चौकशीची मागणी

मालेगाव : बागलाण तालुक्यातील किकवारी (खु) येथील तलाठी मनमानी करत असून, हेतुपुरस्सर खोट्या केस करून त्रास देत असल्या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राज्य लोकायुक्तांकडे निवेदनाद्वारे दाजी नामदेव काकुळते या शेतकऱ्याने केली आहे. निवेदनात किकवारी खु. येथे गट नं. १५० ही स्वत:ची शेती अनेक वर्षांपासून कसत आहे. या शेतीत संबंधित तलाठ्याने काहीही कारण नसताना १४ नंबर पीक पाहणी केस लावून दोन वेळा चालवून मानसिक व आर्थिक त्रास देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या केसमध्ये उपविभागीय अधिकाऱ्यांनी काकुळते यांच्या बाजूने निकाल दिला आहे. तरीही पुन्हा तलाठी केस करून त्रास देत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सदर तलाठ्याने खोट्या नोदी केल्याचा उल्लेख निवेदनात आहे. यात गट नं. ८७ वर विहीर, तर १४८ नंबरवर डाळींबबागा दाखविल्याचा आरोप काकुळते यांनी केला आहे. संबंधित तलाठ्याविरोधात माहिती अधिकार प्रकरणाची चौकशी दीड वर्षापासून प्रलंबित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सदर तलाठ्याची चौकशी करुन योग्य ती कारवाई करावी व आपल्यावरील अन्याय दूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)