शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनकर्त्यांना संरक्षण देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 01:24 IST

कळवण : अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पातून सटाणा शहरासाठी करण्यात येणाऱ्या जलवाहिनीविरोधात आंदोलनासाठी आंदोलनकर्त्यांना पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी राज्य सरकारकडे करावी, असा निर्णय बैठकीत झाल्यानंतर याबाबत कळवणचे सहायक जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले.

ठळक मुद्देपुनंद प्रकल्प : सहायक जिल्हाधिकाऱ्यांना सर्वपक्षीय नेत्यांचे निवेदन

कळवण : अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पातून सटाणा शहरासाठी करण्यात येणाऱ्या जलवाहिनीविरोधात आंदोलनासाठी आंदोलनकर्त्यांना पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी राज्य सरकारकडे करावी, असा निर्णय बैठकीत झाल्यानंतर याबाबत कळवणचे सहायक जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले.दरम्यान कळवण तालुक्यातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन व मागणीसंदर्भात विचार करून शासनस्तरावरु न ११ मार्चपर्यंत सटाणा नगर परिषदेची पाणीपुरवठा योजना रद्द करावी अन्यथा ११ मार्चपासून कळवण तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी , शेतकरी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कार्यालयासमोर उपोषण करतील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष देवीदास पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, मनसेचे तालुकाध्यक्ष शशी पाटील, भेंडीचे माजी सरपंच विलास रौंदळ, रामदास देवरे, किसान सभेचे तालुका सरचिटणीस मोहन जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामा पाटील यांच्या शिष्टमंडळाने सहायक जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांची भेट घेऊन निवदेन देऊन चर्चा केली. राज्य सरकारने आम्हाला आंदोलन करण्यासाठी पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे.आजपासून काम सुरू होण्याची शक्यता सटाणा नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला विरोध केला तर तुमच्या विरोधात गुन्हे दाखल करू, शेतात असलेली पिके तत्काळ काढा नाहीतर नासधूस करू, असा सज्जड दम पोलीस यंत्रणेने पुनंद प्रकल्प परिसरातील सुपले दिगर भागातील आदिवासी बांधवांना दिल्याने आदिवासी बांधव भयभीत झाले आहे. पुनंद प्रकल्पातून जलवाहिनी संदर्भात पोलीस यंत्रणा, पाणीपुरवठा योजना विभाग यंत्रणेने बुधवारी पाहणी करून सुपले दिगर परिसरात शेतकरी बांधवांना सूचना केल्या. गुरुवार (दि.७) सकाळपासून जलवाहिनी कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान आदिवासी बांधवांना विश्वासात न घेता कळवण तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, शेतकरी बांधवांचा असलेला विरोध पत्करून राज्य सरकार, पोलीस यंत्रणा धाकदडपशाही करून पाणीपुरवठा योजना पूर्ण करणार असेल तर ते स्वप्न धुळीस मिळवू व आदिवासी जनतेला बरोबर घेऊन जनआंदोलन हाती घेऊ, असा इशारा देण्यात आला आहे.