चांदवड : पंचायत समितीच्या मंगरूळ गणात देवरगाव येथील उमेदवार जयश्री माधव अहिरे यांनंी प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिली. त्यांच्या पतीच्या नावावर खादी ग्रामोद्योग चांदवडचे दहा हजारांचे कर्ज आहे. त्यांची वडिलोपार्जित शेती विटावे (ता. चांदवड) येथे असून, त्यांनी शेती व कर्ज नसल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र दिले आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी याची शहानिशा न करताच त्यांचा उमेदवारी अर्ज मंजूर केला व त्यांना कॉँग्रेस पक्षाची उमेदवारी दिली व पर्यायाने मला कॉँग्रेसची उमेदवारी मिळाली नाही. या घटनेची योग्य चौकशी करावी, अशी मागणी येथील अपक्ष उमेदवार शोभा भीमराव निरभवणे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून, अन्यथा आपण न्यायालयात जाऊ असेही त्यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)
प्रतिज्ञापत्राबाबत चौकशी करण्याची मंगरूळला मागणी
By admin | Updated: February 9, 2017 23:17 IST