शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कुलगुरू वायुनंदन यांचे अकाउंट हॅक करून पैशांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:14 IST

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई. वायुनंदन यांचे फेसबुक हॅक करून सायबर चोरट्याने त्यांच्या मित्रांशी ...

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई. वायुनंदन यांचे फेसबुक हॅक करून सायबर चोरट्याने त्यांच्या मित्रांशी संवाद साधून पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुदैवाने अशाप्रकारचे संदेश फेसबुक मॅसेंजरच्या माध्यमातून प्राप्त होताच वायुनंदन यांच्या मित्रांनी त्यांचाशी संवाद साधून अशाप्रकारे पैशांची मागणी होत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर वायुनंदन यांनी सोशल माध्यमांतून असाप्रकार घडल्याचे स्पष्ट केले आहे.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई. वायुनंदन यांचे फेसबुुक अकाउंट सोमवारी (दि.१०) सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास हॅक करून वायुनंदन यांना तत्काळ काही पैशांची गरज असल्याचे एकाने भासवत ऑनलाइन पैशांची मागणी केली. त्यासाठी सायबर चोरट्याने पीवायटीएम ०१२३४५६ आयएफएश कोड असलेल्या खाते क्रमांक ९१८० ९९६५३०४७ वर पैसे पाठविण्याची विनंती केली. मात्र पैशांची मागणी करणाऱ्या सायबर चोरट्याने अवघ्या आठ ते दहा हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे वायुनंदन यांना जवळून ओळखणाऱ्या त्यांच्या मित्रांना या संदेशांविषयी संशय आल्याने त्यांनी या गोष्टीची वायुनंदन यांना कल्पना दिली. त्यामुळे वायुनंदन यांनी तत्काळ फेसबुक व अन्य सोशल माध्यमांतून आपले फेसबुक अकाउंट हॅक झाले असून, संबंधितांकडून पैशांची मागणी करणारे संदेश पाठविले जात असल्याचे स्पष्ट करीत अशा फेक संदेशांना कोणीही बळू पडू नये, असे आवाहन केले. त्यामुळे सायबर चोरट्यांचा वायुनंदन यांच्या नावाने सामान्य नागरिकांकडून पैसे उकळण्याचा डाव उधळला गेला आहे.

कोट-

फेसबुकवरून पैशांची मागणी करणारे फेक संदेश दिले जात असल्याचे समजताच फेसबुकवरून अशा प्रकारच्या संदेशांना कोणीही बळी पडू नये, असे आवाहन केले. त्यामुळे कोणीही या फेक संदेशांना बळी पडलेले नाही. मात्र असा प्रकार घडणे दुर्दैवी असून, याविषयी संपूर्ण तपशील घेऊन सायबर पोलिसांमध्ये तक्रार करणार आहे. -

-ई. वायुनंदन, कुलगुरू, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ

सायबर गुन्हेगारांचा उपद्रव वाढला

नाशिक शहरात गेल्या काही दिवसांमध्ये सायबर गुन्हेगारांचा उपद्रव वाढला आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीच नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप थेटे यांना फोनवरून ईडीचा अधिकारी असल्याचे भासवत खंडणी मागण्याचा प्रकार ताजा असतानाच अवघ्या दोन दिवसांत चक्क कुलगुरूंचेच फेसबुक अकाउंट हॅक करून फेसबुक फ्रेंड्सकरून पैसे मागण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे नाशिक शहरात सायबर गु्न्हेगारांचा उपद्रव वाढल्याने सायबर पोलिसांसमोर या गुन्हेगारांनी आ‌व्हान निर्माण केले आहे.