शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

गोदा घाटावर मांसविक्रीवर बंदीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:49 IST

गोदा घाटावर दर बुधवारी भरणाºया आठवडे बाजारात उघड्यावर मांस-मासळीची विक्री होत असल्याने नदीचे पावित्र्य धोक्यात आले असून, प्रदूषणातही भर पडत आहे. त्यामुळे सदर मांस-मासे विक्रीवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी गोदाप्रेमी नागरी सेवा समितीने निवेदनाद्वारे केली आहे.

नाशिक : गोदा घाटावर दर बुधवारी भरणाºया आठवडे बाजारात उघड्यावर मांस-मासळीची विक्री होत असल्याने नदीचे पावित्र्य धोक्यात आले असून, प्रदूषणातही भर पडत आहे. त्यामुळे सदर मांस-मासे विक्रीवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी गोदाप्रेमी नागरी सेवा समितीने निवेदनाद्वारे केली आहे.गोदाप्रेमी नागरी सेवा समितीचे अध्यक्ष देवांग जानी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गोदावरी संवर्धन कक्षाचे प्रमुख उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, उच्च न्यायालयाने गोदावरी नदीतील जलशुद्धीकरण प्रक्रियेबाबत गंभीर दखल घेत सदर प्रक्रिया होत नसेल तर महापालिकेने त्याबाबत कारवाई करण्याचे आदेशित केलेले आहे. गोदावरी नदीकाठावर प्राचीन रामगया कुंड, खंडोबा कुंड, बाजीराव पेशवे कुंड परिसरात दर बुधवारी आठवडे बाजार भरतो. या बाजारात उघड्यावर मांस व मासे विक्री केली जाते. सदर विक्रेत्यांकडून मांस-मासे नदीपात्रातील पाण्यातच धुतले जातात. त्यामुळे नदीपात्र प्रदूषित होत असते. परिणामी, नदीचे पावित्र्यही धोक्यात येते. याच परिसरात अनेक प्राचीन मंदिरेही असून उघडपणे मांसविक्री होत असल्याने भावना दुखावल्या जातात. सदरची मांस व मासे विक्री तातडीने थांबवावी आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करावे, अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी समितीचे कार्यकर्ते चिराग गुप्ता, किशोर गरड, नरेंद्र धारणे, अतुल शेवाळे, योगेश रामय्या, मुकेश चोथाणी, रघुनंदन मुठे, अमोल शिंदे आदी उपस्थित होते.