शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

झेंडूची मागणी अधिक; पुरवठा कमी

By admin | Updated: October 20, 2015 21:50 IST

मुहूर्त दसऱ्याचा : अल्प पावसाने घटले उत्पादन

नाशिक : दसरा-दिवाळीला झेंडूच्या फुलांना सर्वाधिक मागणी असते. या पार्श्वभूमीवर फुलशेती करणारे शेतकरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर झेंडूचे उत्पादन घेतात; मात्र यंदा वरुणराजाने पावसाळ्यात समाधानकारक हजेरी न लावल्याने उत्पादनात घट होऊन बाजारात झेंडूचा पुरवठा उपलब्ध मागणीच्या तुलनेत कमी पडला आहे. परिणामी झेंडूचा बाजार ऐन दसऱ्याच्या दोन दिवस अगोदरच तेजीत आला आहे. ऐन झेंडूच्या वाढीच्या हंगामात पावसाने ओढ दिल्याने फुलांच्या गुणवत्तेवर, तसेच उत्पादनावरही परिणाम झाला. बाजारात दाखल होणारा झेंडू काही प्रमाणात कोमेजलेला व आकाराने लहान असल्याचे दिसून येत आहे. काही शेतकऱ्यांनी दिवाळी डोळ्यासमोर ठेवून झेंडूची विलंबाने लागवड केली. त्यामुळे त्यांना परतीच्या पावसाचा फायदा झाला व झेंडू चांगल्या प्रमाणात बहरण्यास मदत झाली; मात्र यावेळेस झेंडूचे जे मळे फुलले होते त्या फुलांवर परतीच्या पावसारूपी मोठे संकट कोसळले. गुरुवारी (दि.२२) विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर फुलबाजारामध्ये पहाटे होणाऱ्या लिलावामध्ये झेंडूची दीडशे-दोनशे रुपये प्रति जाळीप्रमाणे शेतकऱ्यांकडून ठोक विक्री व्यापाऱ्यांना केली जात आहे. घाऊक व्यापाऱ्यांकडून मंगळवारच्या किरकोळ बाजारात सुमारे तीनशे-चारशे रुपये प्रती जाळी याप्रमाणे झेंडू विकला गेला. यामुळे ग्राहकांना ३० ते ३५ रुपये पावशेर या दराने झेंडू खरेदी करावा लागला. (प्रतिनिधी)