मनमाड येथे गुरुगोविंद शाळेत लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी पहाटेपासूनच नागरिक लसीकरणासाठी रांग लावत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. तासनतास रांगेत उभे राहूनसुद्धा डोस संपल्यानंतर काही नागरिकांना लस न घेता परत जावे लागते. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागतो. मनमाड शहराची लोकसंख्या पाहता शहराच्या कॅम्प भागात दुसरे लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे तसेच डोसची संख्या वाढवण्यात यावी, अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली. याबाबत पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. एस. नरवणे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी समितीचे अध्यक्ष राजाभाऊ पारिक, सचिव एस. एम. भाले, कार्याध्यक्ष नरेंद्र कांबळे, कृष्णाजी पगारे, दिलीप आव्हाड आदी सदस्य उपस्थित होते.
080721\img-20210708-wa0005.jpg
मनमाड येथे वैद्यकीय अधिकारी डॉ जी एस नरवणे यांच्याशी चर्चा करताना समितीचे अध्यक्ष राजाभाऊ पारिक, एस एम भाले,नरेंद्र कांबळे, कृष्णाजी पगारे आदी