सिन्नर : तालुक्यात सलग तीन वर्षांपासून पावसाअभावी दुष्काळी स्थिती आहे. शासनाने तालुका टंचाईग्रस्त म्हणून जाहीर केला आहे. सध्या जनावरांचा चारा व पाण्याचा प्रश्न उग्र रूप धारण करीत असल्याने शासनाने शेतकऱ्यांचे पशुधन वाचविण्यासाठी चारा व पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे. तालुक्यात सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे भूजल पातळी खालावली असून, अद्यापही पाऊस झाला नसल्याने चारा पाण्याची तीव्रता वाढली असल्याने विहिरीच्या पाण्याची पातळी खोल गेली आहे.पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांकडे असलेला चारा संपला आहे. याचा परिणाम परिसरातील दूध उत्पादनावर दिसू लागला आहे. चारा पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे दुभत्या गायी-म्हशी, बैल बाजारात उभे करण्याची वेळ बळीराजावर ओढावणार असल्याचे भारतीय जनता पक्षाच्या भटक्या विमुक्त सेलच्या वतीने देण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे. शासनाने सदर टंचाईग्रस्त परिस्थितीचा आढावा घेऊन जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याची मागणीही दत्ता गोसावी यांच्यासह शेतकऱ्यांनी निवेदनात केली आहे. (वार्ताहर)
चारा उपलब्ध करून देण्याची मागणी
By admin | Updated: July 5, 2014 00:20 IST