पेठ : गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ वर कोटंबी गावानजीक दोन्ही बाजूला गतिरोधक बसवण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.कोटंबी घाटातून भरधाव येणारी वाहने गावाजवळ असलेल्या प्रवासी शेड जवळच्या वळणावर नियंत्रण सुटून अपघात होत आहे. या ठिकाणी प्राथमिक शाळा असल्याने वर्दळ असते. शिवाय नागरी वस्ती असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला गतिरोधक बसवण्यात यावे तसेच शाळेच्या बाजूने भक्कम संरक्षक भिंत बांधण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ व शिक्षकांकडून करण्यात आली आहे.कोटंबी हे गाव गडदुणे, म्हसणविहिरा, उस्थळे, हनुमंतपाडा, हेदपाडा, एकदरे आदी गावांचे दळणवळणाचे केंद्र असून, येथील प्रवासी नेहमी वळणावर असलेल्या निवारा शेडचा आधार घेत असतात. घाटातून येणारी वाहने जोरात येत असल्याने अपघात होत आहे. गावाजवळ गतिरोधक बसवणे आवश्यक आहे.- शशिकांत भुसारे, ग्रामस्थ, कोटंबी.
कोटंबी येथे गतिरोधक बसवण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 01:47 IST
पेठ : गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ वर कोटंबी गावानजीक दोन्ही बाजूला गतिरोधक बसवण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
कोटंबी येथे गतिरोधक बसवण्याची मागणी
ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्ग : अपघातांचे वाढते प्रमाण चिंताजनक