जनता दल नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने पाणीपुरवठा विभागाचे अभियंता जयपाल त्रिभुवन यांची भेट घेत चर्चा केली. गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या अडचणी व तांत्रिक बाबींमुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत हाेत आहे. नेमक्या काय अडचणी आहेत याची माहिती नगरसेवकांनी जाणून घेतली. द्याने, म्हाळदे, कलेक्टरपट्टा आदी भागांचा शहरात समावेश झाल्याने लाेकसंख्या वाढली आहे. साहजिकच पाण्याचा वापरही वाढला आहे, अशा परिस्थितीत नागरिकांना मुबलक व वेळेत पाणीपुरवठा करण्याची मनपाची जबाबदारी आहे. मात्र, सुरळीत पाणी मिळत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त हाेत आहे. चणकापूरच्या आवर्तनाने तळवाडे तलाव भरून घेतला जाताे. या तलावाचे पाणी पिण्यासाठी आरक्षित आहे. वर्षभरात १४०० दशलक्ष घनफूट पाणी दिले जाते. यात वाढ करून वर्षाला किमान दाेन हजार दशलक्ष घनफूट मिळणे अपेक्षित आहे. तळवाडेतून दरराेज १५ ते २० एमएलडी पाणी उचलले जाते. ही क्षमता वाढवून किमान २५ ते ३० एमएलडी पाणी उचलण्याचे नियाेजन करावे, असे गटनेत्या शान यांनी सांगितले. जलवाहिनी जुनी असल्याने वाढीव पाणी उचलल्यास ती फुटण्याची शक्यता असल्याचे त्रिभुवन यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी नगरसेवक अब्दुल बाकी राशनवाला, माेहंमद अन्सारी, संदीप पाटील आदी उपस्थित हाेते.
इन्फो
सुपर एक्स्प्रेस फिडरची गरज
गिरणा धरणातून सुरळीत पाणीपुरवठा हाेत नसल्याची तक्रार करण्यात आली. विजेची समस्या असल्याचे उत्तर मिळाल्याने दहिवाळ सबस्टेशन ते गिरणा धरण पंपिंग स्टेशनदरम्यान सुपर एक्स्प्रेस फिडर बसवावे. यासाठी वीज कंपनीला प्रस्ताव सादर करून तशी मागणी करावी, असे नगरसेवक मुस्तकिम डिग्निटी यांनी सांगितले.
इन्फो
मासेमारी ठेक्याला विराेध
तळवाडे तलावातून मासेमारीचा ठेका देण्याचा प्रयत्न हाेत आहे. यासंदर्भात प्रशासकीय स्तरावर काही कार्यवाही झाली आहे का? याची माहिती जाणून घेण्यात आली. तळवाडचे पाणी शहरातील जनतेच्या पिण्यासाठी आरक्षित आहे. मासेमारी ठेक्यास महागठबंधनाचा पूर्णपणे विराेध आहे. त्यामुळे ठेका मंजूर केला तर जनतेच्या राेषाचा सामना करावा लागेल, असा इशारा नगरसेवक डिग्निटी यांनी दिला.
फोटो- २९ मालेगाव वॉटर
===Photopath===
290521\29nsk_15_29052021_13.jpg
===Caption===
फोटो- २९ मालेगाव वॉटर