शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

स्नानाची वेळ वाढवून देण्याची मागणी

By admin | Updated: September 7, 2015 23:15 IST

प्रस्ताव : त्र्यंबकला आखाडा परिषदेची बैठक

 त्र्यंबकेश्वर : आखाड्यांच्या शाहीस्नानाच्या वेळा पोलीस व जिल्हा प्रशासनाने वाढवून द्याव्यात यासह इतर मागण्यांचा प्रस्तावाला सोमवारी त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या सर्व आखाड्यांच्या बैठकीत सर्व सदस्यांनी हरहर महादेवच्या जयघोषात हात वर करून एकमुखाने मान्यता दिली. या संबंधात प्रशासनाने आखाडा परिषद व प्रशासन यांची संयुक्त बैठक ८ ते ११ सप्टेंबर दरम्यान बोलवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली़ त्र्यंबकेश्वर येथे नीलपर्वत येथील श्रीपंच दशनाम जुना आखाडा येथे त्र्यंबकेश्वरमधील दहाही आखाड्यांची बैठक संपन्न झाली़ अध्यक्षस्थानी त्र्यंबकेश्वर आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी होते़ त्र्यंबकेश्वरच्या साधू आखाड्यांच्या शाहीस्नानाचा गॅझेट सन १८00 सालातील त्यावेळच्या साधूंच्या संख्येला अनुसरून दिला आहे. आता आखाड्यांतील साधूंची संख्या वाढली आहे. भाविकांची संख्यादेखील दहापट वाढली आहे आणि स्नानाची वेळ तीच आहे. प्रत्येक आखाड्याने कुशावर्तावर पोहचण्याची वेळ, स्नानाची वेळ, कुशावर्तावरून निघण्याची वेळ, मंदिरात जाण्याची वेळ आदि वेळा निश्चित असल्या तरी इतर आखाडे लगेच कुशावर्तावर येत असतात. त्यामुळे प्रत्येक आखाड्यांच्या देवता, महामंडलेश्वर, श्री महंत, साधू महात्मा यांना स्नानासाठी वेळ पुरत नाही. त्यामुळेच प्रशासनाने आपल्या अधिकारात वेळ वाढवून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दि. २८ आॅगस्ट रोजी कुशावर्त तीर्थ व परिसरात साधू व आखाड्यांच्या भाविकांना स्नानासाठी रोखले होते़ यावेळी आखाड्यांच्या शाही मिरवणुकीत सामील झालेल्या भाविकांना, आखाड्याचे पुरोहित ब्राह्मण यांनाही स्नानासाठी सोडावे. आखाड्याच्या शाही मिरवणुकीत सामील असलेल्या पुरुष, महिला, माता-भगिनींची पोलिसांनी ओढाताण केली. असे पुन्हा होता कामा नये. तसेच माध्यम प्रतिनिधींची एका ठिकाणी व्यवस्था करून द्यावी. यासह इतर ठराव यावेळी संमत करण्यात आले. बैठकीस महंत हरिगिरी, महंत गोविंदानंद ब्रह्मचारी महंत शंकरानंद सरस्वती (आनंद आखाडा), रामानंदपुरी (निरंजनी), प्रेमगिरीजी (आखाडा परिषद सचिव, जुना आखाडा), उमा भारती (जुना), आशिशगिरीजी (निरंजनी), रमेशगिरीजी (महानिर्वाणी), राजेंद्रसिंहजी (निर्मल), जगतारमुनीजी, त्रिवेणीदासजी (नया उदासीन), प्रेमानंदजी (उदासीन बडा), सत्यगिरीजी (आवाहन आखाडा) आदि संत-महंत उपस्थित होते. दरम्यान, बैठकीचे इतिवृत्त लिहिण्यापूर्वी गोदावरीत तळेगाव धरणाचे पाणी घेण्याकरिता लग्नस्तंभ डोंगराला बोगदा पाडून पाइपलाइनद्वारे पाणी घ्यावे व शहरातील सेव्हरेज लाइन शहरापासून दूर न्यावी, असे प्रस्ताव मंजूर केले. (वार्ताहर)पालखेड येथे नेत्र तपासणी शिबीर दिंडोरी : पालखेड बंधारा ता . दिंडोरी येथे आदित्या ज्योत हॉस्पिटलच्या वतीने , नेत्र तपासणी शिबीर संपन्न झाले. या शिबिराचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले . या शिबिरात महिला तसेच ग्रामस्थ त्याचबरोबर विद्यार्थी विद्यार्थिनी ही भाग घेऊन नेत्र तपासणी केली . त्यात सतरा जणांना चष्म्याचे वाटप करण्यात आले . डॉ . शेख यांनी रु ग्णांना माहिती दिली. (वार्ताहर)या प्रसंगी सरपंच सुनिल हेंद्रे , उपसरपंच उत्तम जाधव , साहेबराव गोतरणे , संदीप गायकवाड , भारत गोतरणे , यादव कोकाटे यांनी ग्रामपंचायत वतीने आभार मानले . डॉ . अशोक भालेराव , विमल त्रीभवने , राहुल शिंदे , माया गवारे , सुनिता वाघ वैष्णवी सातवे , मीना शेतवास यांनी कार्यक्र म यशिस्वतेसाठी प्रयत्न केले .