शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

राजापूर येथे तीव्र पाणी टंचाई टॅँकर वाढविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 22:07 IST

राजापूर : येवला येथे सध्या चांगला पाऊस झाल, पण तालुक्यातील राजापूर येथे अजून चांगला पाऊस पडलेला नसल्याने शेतकरी व नागरीक हैराण झाले आहे.

ठळक मुद्दे पाणी कोठे मिळेल या चिंतेने येथील जनता हैराण झाले आहे.

राजापूर : येवला येथे सध्या चांगला पाऊस झाल, पण तालुक्यातील राजापूर येथे अजून चांगला पाऊस पडलेला नसल्याने शेतकरी व नागरीक हैराण झाले आहे.पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी वरून राजाचे आगमन झाले नसल्याने राजापूर गाव व वाड्या,वस्त्यावर पिण्याच्या पाण्याची भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.तहान भागविण्यासाठी व जनावरांना पिण्यासाठी राजापूर व पूर्वेकडील भागात पाणी टंचाई असल्याने टॅँकर दोन दिवसापासून आलेले नाहीत, त्यामुळे राजापूर व सोमठाणजोश या दोन गावे व वाड्या, वस्त्यावर पावसाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.ही पाणी टंचाई दूरकरण्यासाठी टॅँकरमध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.राजापूर येथील वाड्या,वस्तीवर भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. राजापूर हे गाव मोठे असून येथे दोन टॅँकरने पाणी पूरवठा सुरू आहे. त्यामध्ये गावासाठी दोन तर वाड्या,वस्त्यावरील लोकांना दोन खेपा सध्या सुरू आहेत. परंतू दोन दिवसापासून टॅँकरच आले नसल्याने राजापूर येथे पिण्यासाठी पाणी टंचाई भयानक परिस्थिती झाली आहे. शिवाय पाऊसच नसल्याने परिसरातील विहिरी कोरड्या पडल्या असून पाणी कोठे मिळेल या चिंतेने येथील जनता हैराण झाले आहे.अलगट वस्ती, हवालदार वस्ती, भैरवनाथवाडी या तीन वाड्या मोठ्या आहे. तर काही वस्त्या, वाड्या लहान आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीला पाणी वाटप करतांना कसरत करावी लागत आहे. जेवढे गाव आहे, त्यापेक्षा जास्त लोक वाड्या,वस्तीवर राहत असल्याने पाणी टंचाई या समस्येने जनता हैराण झाली आहे.गाव दुष्काळी मंडलात असूनही शासनाने पाहीजे त्याप्रमाणे पाणी मिळत नाही व अजून राजापूर येथे मोठा पाऊस झाला नसल्याने कधी एकदाचा पाऊस पडेल अन पिण्यासाठी पाणी मिळेल अशी आशा येथील जनतेला लागली आहे.सध्या पाण्याचे टॅँकर पुरत नाही एका वस्त्यावर नंबरप्रमाणे टॅँकर गेला कि दोनशे ते चारशे लीटरचे पाणी मिळते. त्यामुळे लवकरच आणखी टॅँकर सुरू करण्यात यावे किंवा गावासाठी व वाड्या वस्त्यावर टॅकरच्या खेपामध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी सरपंच सुनिता माळी, उपसंरपच शरद वाघ, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद बोडखे, पोपट आव्हाड, बबन अलगट, भारत वाघ, देविदास जाधव, काशिनाथ चव्हाण, सोपान आव्हाड, माधव आगवण आदी ग्रामस्थांनी केली आहे.सध्या येवला तालूक्यात चांगला पावसाची नोंद झाली असे हे शासनाला खरे वाटते पण राजापूर येथे विहिरी बंधारे कोरडे ठाक आहेत. टॅकरच्या पाण्यावर येथील जनतेची तहान भागवावी लागत आहे.- शरद वाघ, उपसंरपच, राजापूर.