शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
2
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
3
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
4
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
5
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
6
लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव
7
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
8
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
9
सोमवारी बँक सुरू की बंद? दिवाळीच्या दिवशी बँकेत जाण्यापूर्वी RBI ची सुट्टीची यादी नक्की तपासा!
10
IND vs AUS 1st ODI : गिलनं साधला मोठा डाव! महेंद्र सिंह धोनीचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड मोडला
11
Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा, अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्याचे आगमन
12
संतापजनक! अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये वापरलेल्या प्लेट्स धुवून दिलं जेवण, प्रवाशांच्या जीवाशी खेळ
13
'द केरला स्टोरी' फेम अदा शर्माचं खरं नाव माहितीये? वेगळं नाव का वापरावं लागलं? म्हणाली...
14
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियानं केल्या १३६ धावा, पण ऑस्ट्रेलियाला मिळालं १३१ धावांचं टार्गेट; कारण...
15
IAS Pawan Kumar : आईने विकले दागिने, वडिलांनी मजुरी करून शिकवलं; लेकाने IAS होऊन कष्टाचं सोनं केलं
16
"गोंद्या आला रे...पुष्पा आला रे...", बोगस मतदान रोखण्यासाठी मनसेचा कोडवर्ड; अविनाश जाधव, राजू पाटलांनी सांगितला प्लान!
17
एका घोटाळ्यामुळे ११७ वर्षांचा इतिहास संपुष्टात! 'हा' शेअर बाजार कायमचा बंद होणार; सेबीची विक्रीला मंजुरी
18
फक्त टार्गेट वाढतं, पगार नाही; कर्मचाऱ्याचा राजीनामा होतोय तुफान व्हायरल, कंपनी म्हणते...
19
"आम्ही ९ ते ५ जॉब करणाऱ्यांपेक्षा जास्त मेहनत करतो...", काजोल बरळली, म्हणाली- "आम्हाला १२-१४ तास..."
20
Raj Thackeray: तो मतदार आला की पकडलाच म्हणून समजा...! मनसेने रचला सापळा; राज ठाकरेंचे घणाघाती भाषण...

करपा रोगाच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या भातशेतीचे त्वरित पंचनामे करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 15:14 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या भात पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु अद्यापही शेतकºयांच्या बांधावर नुकसान झालेल्या भात पिकांची प्रत्यक्षात पाहणी करण्यासाठी एकही लोकप्रतिनिधी अथवा प्रशासकीय अधिकारी आला नाही, त्यामुळे शेतकरी तीव्र नाराज आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य आदिवासी नॅशनल फेडरेशनच्या वतीने तहसिलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देण्यात आले आहे.

ठळक मुद्देनॅशनल आदिवासी फेडरेशनच्यावतीने तहसिलदारांना निवेदन

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या भात पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु अद्यापही शेतकºयांच्या बांधावर नुकसान झालेल्या भात पिकांची प्रत्यक्षात पाहणी करण्यासाठी एकही लोकप्रतिनिधी अथवा प्रशासकीय अधिकारी आला नाही, त्यामुळे शेतकरी तीव्र नाराज आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य आदिवासी नॅशनल फेडरेशनच्या वतीने तहसिलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देण्यात आले आहे.एकीकडे कोरोनाचे संकट त्यात कर्जबाजारी होऊन का होईना शेती मशागतीची कामे पूर्ण करून भात शेतीची लागवड केली आणि मध्येच आता करपा रोगाचे शेतकºयांच्या मुळावर आलेले उभे संकट यामुळे शेतकरी पूर्णपणे खचला आहे. शेतकºयांना फक्त शासनाच्या पंचनामे आणि नुकसान भरपाईचीच आशा आहे. नुकसान झालेल्या भात शेतीची प्रशासनाने प्रत्यक्षात पाहणी करून सदर नुकसानग्रस्त पिकांची शासनाने पंचनामे करून शेतकरी वर्गाला दिलासादायक नुकसानभरपाई द्यावी या मागणीचे निवेदन फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. श्रीराम लहामटे यांनी निवेदनाद्वारे इगतपुरीचे तहसीलदार यांना दिले.या वेळी पंचायत समितीचे सदस्य सोमनाथ जोशी, आदिवासी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम वारघडे, राम शिंदे, गणेश कवटे आदींसह शेतकरी उपस्थित होते.प्रतिक्रि या...एकीकडे शेतकरी समृद्ध झाला असा बडेजाव अनेक नेतेमंडळी करतात परंतू करपा रोगामुळे अनेक शेतकर्यांची भात शेती संपुष्टात आली तरी सुद्धा एकही स्थानिक लोकप्रतिनिधी अथवा शासकीय अधिकारी अद्यापही शेतकर्यांच्या बांधावर सुद्धा गेला नाही. प्रशासनाने त्विरत प्रत्यक्षात नुकसान झालेल्या भातशेतीची पाहणी करून तात्काळ पंचनामे करावेत व शेतकर्यांना दिलासादायक नुकसानभरपाई द्यावी तरच खर्या अर्थाने शेतकरी समृद्ध होईल.- डॉ. श्रीराम लहामटे. युवा राज्य अध्यक्ष, नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन महाराष्ट्र. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी