येवला : उन्हाळ कांद्याचे बाजारभाव घसरले असून, राज्यातील व परराज्यातील बाजार समित्यांमध्ये नवीन लाल कांद्याची आवक सुरू असल्याने दिवसेंदिवस कांद्याच्या भावात घसरण होत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला असून, शासनाने कांद्यास हमीभाव ठरवून द्यावा व बाजार हस्तक्षेप योजना राबवून हमीभाव व शेतकºयांना मिळणारा भाव यातील फरकाची रक्कम किंवा अनुदान रक्कम शेतकºयास द्यावी, अशी मागणी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उषा शिंदे यांनी राज्य शासनाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.येवला बाजार आवारात बुधवारी (दि.५) उन्हाळ कांद्याचे भाव किमान २०० ते कमाल ६९०, तर सरासरी ४२५ रुपये प्रतिक्विंटल होते. तर लाल कांद्याचे भाव किमान ४०० ते कमाल ९३०, तर सरासरी ८०० रुपये प्रतिक्विंटल होते.मार्च, एप्रिलमध्ये चाळीत साठविलेल्या उन्हाळ कांद्यास ७ ते ८ महिने झाल्याने कांद्याची प्रत घसरली आहे. यामुळे उन्हाळ कांद्यास मागणी कमी झाली आहे.शासनाने कांद्यास हमीभाव ठरवून द्यावा तसेच बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत शेतकºयांना मिळणारा भाव व हमीभाव यातील फरक द्यावा, अशी मागणी उषा शिंदे यांनी निवेदनात केली आहे.भाव वाढतील या आशेने साठवून ठेवलेल्या कांद्यास उत्पादन खर्चाएवढाही भाव मिळत नसल्याने शेतकºयांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे. दुष्काळी स्थिती, पाणीटंचाई तसेच अवकाळी पाऊस यासारख्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देऊन तसेच बँका किंवा सावकाराकडून कर्ज घेऊन शेतकºयाने कांद्यासारख्या नगदी पिकाचे उत्पादन घेतले. परंतु चांगला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचे दिसून येत आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 00:53 IST
येवला : उन्हाळ कांद्याचे बाजारभाव घसरले असून, राज्यातील व परराज्यातील बाजार समित्यांमध्ये नवीन लाल कांद्याची आवक सुरू असल्याने दिवसेंदिवस ...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याची मागणी
ठळक मुद्देउषा शिंदे यांचे राज्य शासनाला निवेदन