दिंडोरी : गेल्या चार ते पाच वर्षापासून दिंडोरी-पेठ तालुक्यात अवकाळी पावसाने व गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानग्रस्तांना तुटपुंजी मदत न देता संपूर्णं कर्जमाफी देण्यात यावी,अशी मागणी निवेदनाद्वारे माजी आमदार धनराज महाले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.दिंडोरी-पेठ तालुक्यात सततच्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतपिकांचे व दिंडोरी तालुक्यातील द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. निर्यातक्षम द्राक्ष माती मोल भावाने विकण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आली होती. सातत्याने होणारे नुकसान न भरून येण्यासारखे असून, शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्त्या करीत आहे. नुकसानग्रस्तांना तातडीची मदत देण्यात येईल, असे आश्वासन दिले असतांना देखील आश्वासन पूर्ती करण्यात आली नसून, संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार धनराज महाले यांनी पावसाळी अधिवेशनाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे. (वार्ताहर)
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी
By admin | Updated: August 2, 2015 23:51 IST